India Test Team, (Photo Credits: Twitter@BCCI)

इंग्लंडविरुद्धच्या (England) अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी (Tests Match) बीसीसीआयकडून (BCCI) भारतीय संघाची (Indian Team) घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या संघाच्या तुलनेत यावेळी कोणतेही मोठे बदल झाले नाहीत. संपूर्ण संघ जवळजवळ तोच ठेवला आहे. छोटा बदल म्हणजे अहमदाबादमध्ये फक्त वेगवान गोलंदाज उमेश यादव टीम इंडियामध्ये सामील होईल. पण त्याआधी त्याची फिटनेस तपासली केली जाईल. तो शार्दुल ठाकूरची जागा घेणार आहे. ठाकूरला विजय हजारे ट्रॉफीसाठी रिलीज करण्यात आले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचे दोन कसोटी सामने अहमदाबादमध्ये खेळले जातील. त्याअंतर्गत 24 फेब्रुवारीपासून तिसरी टेस्ट सुरू होणार आहे.

बीसीसीआयने अहमदाबादच्या मोटेरा येथे खेळल्या जाणार्‍या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात चार फिरकीपटूंना स्थान दिले आहे. या उर्वरित दोन कसोटींमध्ये नियमित कर्णधार विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार असेल. अजिंक्य रहाणे संघाचा उपकर्णधार असेल. या चार सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळले गेले होते, त्यातील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली होती तर दुसरी कसोटी भारताने जिंकली होती.

असा असेल भारतीय संघ – विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मो. सिराज (हेही वाचा: Faf du Plessis, दक्षिण आफ्रिका च्या फलंदाजाने Test cricket मधून निवृत्तीची इंस्टाग्राम पोस्ट द्वारा केली घोषणा)

मालिकेचा तिसरा कसोटी सामना अहमदाबादमध्ये पिंक बॉलने खेळला जाईल. इंग्लंडविरुद्ध प्रथमच भारतीय संघ डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर, भारताने अ‍ॅडिलेड येथे डे-नाईट कसोटी सामना खेळला होता, त्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान जखमी झालेले मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि रवींद्र जडेजासारखे खेळाडू अद्याप फिट होऊ शकले नाहीत. यापूर्वी असे म्हटले जात होते की शमी शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये संघात येऊ शकतो.