India National Cricket Team vs England National Cricket Team, T20I Series 2025: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका (IND vs ENG T20I Series 2025) आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ही मालिका 22 जानेवारीपासून सुरू होईल. या दौऱ्यात प्रथम टी-20 मालिका खेळवली जाईल. मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे, तर जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ कठीण आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. (हेही वाचा - India vs England, 1st T20I Match Stats: कोलकाताच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाची कशी आहे कामगिरी? आकडेवारीमध्ये घ्या जाणून)
मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे, तर जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ कठीण आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. या मालिकेत घरच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न टीम इंडिया करेल. सूर्यकुमार यादव हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि तो मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात फटके मारू शकतो.
भारतीय संघात तरुण आणि अनुभवी खेळाडूंना संधी मिळाली आहे. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. हार्दिक पांड्याकडे टी-20 मालिकेत फलंदाजीने मोठा विक्रम रचण्याची सुवर्णसंधी आहे.
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याने आतापर्यंत टी- 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 85 सामन्यांमध्ये एकूण 1700 धावा केल्या आहेत. या काळात हार्दिक पंड्याच्या फलंदाजीतून चार अर्धशतके झाली आहेत. सध्या, हार्दिक पांड्या हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. आता जर हार्दिक पांड्याने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत आणखी 60 धावा केल्या तर तो शिखर धवनला मागे टाकू शकतो. शिखर धवनने आतापर्यंत टीम इंडियासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1759 धावा केल्या आहेत.
टीम इंडियासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज:
रोहित शर्मा – 4231 धावा
विराट कोहली - 4188 धावा
सूर्यकुमार यादव - 2570 धावा
केएल राहुल - 2265 धावा
शिखर धवन - 1759 धावा
हार्दिक पंड्या - 1700 धावा.
त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 89 विकेट्स घेतल्या आहेत.
अनुभवी अष्टपैलू हार्दिक पांड्याने 2016 मध्ये आपला पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता हे आम्ही तुम्हाला सांगतो. तेव्हापासून हार्दिक पांड्या हा टीम इंडियाचा एक महत्त्वाचा दुवा राहिला आहे. हार्दिक पांड्याने आतापर्यंत भारतीय संघासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 89 विकेट्स घेतल्या आहेत. हार्दिक पांड्याने टीम इंडियासाठी 11 कसोटी आणि 86 एकदिवसीय सामने खेळले आहेत.