![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/07/Untitled-design-2022-07-11T165348.735.jpg?width=380&height=214)
India National Cricket Team vs England National Cricket Team, 2nd ODI Match 2025: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना (IND vs ENG 2nd ODI 2025) रविवारी म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता कटकमधील बाराबती स्टेडियमवर (Barabati Stadium, Cuttack) खेळला जाईल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा चार विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे.
हेड टू हेड रेकाॅर्ड (IND vs ENG Head to Head)
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील आतापर्यंतच्या लढतींमध्ये भारतीय संघाने वरचढ कामगिरी केली आहे. टीम इंडियाने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध एकूण 108 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात टीम इंडियाने 59 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, इंग्लंड संघाने 44 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. दरम्यान, 2 सामने बरोबरीत सुटले आणि 3 सामन्यांमध्ये निकाल लागला नाही. घरच्या मैदानावर खेळताना टीम इंडियाने इंग्लंडला 35 एकदिवसीय सामन्यांमध्ये हरवले आहे आणि 17 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.
हे देखील वाचा: Team India ODI Stats At Cuttack: कटकमध्ये टीम इंडियाची 'अशी' आहे कामगिरी, एका क्लिकवर येथे वाचा आश्चर्यकारक आकडेवारी
कटकमध्ये इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाची कशी आहे कामगिरी
कटकच्या मैदानावर टीम इंडियाने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध 10 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात टीम इंडियाने सहा सामने जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत. या मैदानावर दोन्ही संघांमध्ये शेवटचा एकदिवसीय सामना 2017 मध्ये खेळला गेला होता, जो टीम इंडियाने 15 धावांनी जिंकला होता.