Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 25, 2024
ताज्या बातम्या
25 minutes ago

BAN 144 in 19.2 Overs | IND vs BAN 3rd T20I 2019 Live Score Updates: बांग्लादेशचा 30 धावांनी पराभव करत टीम इंडियाने 2-1 ने जिंकली मालिका

क्रिकेट Priyanka Vartak | Nov 10, 2019 10:53 PM IST
A+
A-
10 Nov, 22:53 (IST)

20 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर दीपक चहरने मुस्तफिजुर रहमानला श्रेयस अय्यरच्या हाती झेलबाद केले. रहमान त्याचा पाचवा बळी ठरला. टी -20 मध्ये पाच विकेट्सच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा चाहर चौथा भारतीय गोलंदाज बनला आहे. याच्यानंतर दीपकने अमिनुल इस्लाम याला बाद करत हॅटट्रिक पूर्ण केली. भारतासाठी टी-20 मध्ये हॅटट्रिक घेणारा दीपक पहिला गोलंदाज आहे.

10 Nov, 22:43 (IST)

दीपक चहरने बांग्लादेशवर वर्चस्व कायम ठेवले. 18 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर शफीउलला केएल राहुलच्या हाती झेलबाद करून चहारने बांग्लादेशला आठवा धक्का दिला. चाहरने तीन षटकांत सात धावा देऊन चार बळी घेतले आहेत.

10 Nov, 22:38 (IST)

पहिल्या तीन षटकांत बऱ्याच धावा लुटवल्यानंतर युजवेंद्र चहलला अखेर या सामन्यात पहिले यश मिळाले. 17 व्या षटकातील पाचव्या बॉलवर त्याने महमुदुल्लाला बाद केले. भारत विजयापासून तीन विकेट दूर आहे. टी -20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 50 विकेट पूर्ण केल्या. 

10 Nov, 22:07 (IST)

शिवम दुबे याने बांग्लादेशविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात मुशफिकुर रहीमला ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर बोल्ड केले. मुशफिकुर रहीम दुबेची पहिली आंतरराष्ट्रीय विकेट ठरला. 

10 Nov, 22:03 (IST)

मोहम्मद मिथुन आणि मोहम्मद नईम यांची भागीदारी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत असताना, दीपक चाहरने मिथुनला झेल बाद करत संघाला महत्वाची विकेट मिळवून दिली. चाहरच्या गोलंदाजीवर मिथुनने षटकार करण्याचा प्रयत्न केलं, पण चेंडू जास्त लांब जाऊ शकला नाही आणि के एल राहुलने सीमा रेषेजवळ झेल पकडला. मिथुनने 27 धावा केल्या. नईम आणि मिथुन यांच्यात 98 धावांची भागीदारी झाली.

10 Nov, 21:59 (IST)

या सामन्यात पहिले श्रेयस अय्यरने कारकिर्दीतील पहिले टी-20 अर्धशतक ठोकले आणि आता मोहम्मद नईमने चौकार ठोकत कारकिर्दीतील पहिले टी-20 अर्धशतक ठोकले. वॉशिंग्टन सुंदरची मागील ओव्हर भारतासाठी महागात पडली. या ओव्हरमध्ये त्याने एकूण 17 धावा दिल्या. 

10 Nov, 21:54 (IST)

मोहम्मद नईमनंतर आता मोहम्मद मिथुनची चांगली फलंदाजी करत आहे. मिथुनने शिवम दुबेच्या षटकात दोन चौकार ठोकले. मिथुन आणि नईम यांच्यात अर्धशतकी भागीदारी आहे आणि ही जोडी आता भारतासाठी धोकादायक ठरू लागली आहे. नईमने यादरम्यान पहिले टी-20 अर्धशतकाही केले. नईमने चौकार ठोकत पहिले टी-20 अर्धशतक पूर्ण केले.

10 Nov, 21:42 (IST)

मोहम्मद नईम क्रीजवर आपला शानदार खेळ दाखवत आहे. वॉशिंग्टन सुंदर याच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर नईमने गोलंदाजीच्या डोक्यावरून षटकार मारला. नईम त्याच्या अर्धशतकच्या जवळ पोहचला आहे. पहिल्या दोन ओव्हरमध्ये मोठा धक्का बसल्यानंतर मोहम्मद नईम आणि मिथुन डाव हाताळण्याचा प्रयत्न करीत असून यासह बांगलादेशची 50 धावाही पूर्ण झाल्या आहेत.

10 Nov, 21:12 (IST)

टीम इंडियाने बांग्लादेश संघाला तिसरा टी-20 सामना जिंकण्यासाठी 175 धावांचे आव्हान दिले आहे. याच्या प्रत्युत्तरात बांग्लादेशने दुसऱ्या ओव्हरमध्ये दोन फलंदाज गमावले. दीपक चाहर याने दुसरी ओव्हर टाकली. या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर लिटन दास आणि पाचव्या चेंडूवर सौम्य सरकार बाद झाले. दासने 9 धावा केल्या तर सरकार पहिल्याच चेंडूवर 0 धावांवर माघारी परतला. 

10 Nov, 20:44 (IST)

भारत आणि बांगलादेश यांच्यात नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर तीन सामन्यांत पहिले फलंदाजी करत भारताने निर्धारित ओव्हरमध्ये 175 धावांचे लक्ष्य दिले आहेत. भारताकडून श्रेयस अय्यर याने सर्वाधिक 62 धावा केल्या, तर के एल राहुल 52 धावांवर माघारी परतले. दोन्ही संघातील आजचा हा निर्णायक सामना आहे.

Load More

India vs Bangladesh 3rd T20I Match 2019: भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा तिसरा आणि अंतिम निर्णायक सामना आज नागपूर (Nagpur) च्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन (Vidarbh Cricket Assosiation) स्टेडियमवर खेळला जाईल. आजचा सामना जिंकून दोन्ही संघ मालिका जिंकण्याचा प्रयत्न करतील. सामन्याचे थेट प्रक्षेपण संध्याकाळी सात वाजल्यापासून होईल, तर दोन्ही संघांचे कर्णधार सायंकाळी साडेसहा वाजता टॉससाठी मैदानात उतरतील.आजच्या निर्णायक मॅचसाठी संघाचा कर्णधार रोहित शर्मा प्लेयिंग इलेव्हनमध्ये एक बदल करू शकतो. बांग्लादेशविरूद्ध आजच्या सामन्यात वेगवान गोलंदाज खलील अहमद उभाच्या जागी मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याला संघात स्थान मिळू शकते. मागील दोन सामन्यांमध्ये खलील टीम इंडियासाठी खूप महागडा गोलंदाज सिद्ध झाला. खलीलने पहिल्या टी-20 सामन्यात 37, तर दुसर्‍या सामन्यात 44 धावा लुटलेल्या होत्या. (सामन्याचा थेट स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्यापहिल्या टी-20 सामन्यात सामन्यात बांग्लादेशने भारताला 7 विकेट्सने पराभूत केले होते, तर रोहितच्या शानदार फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने दुसर्‍या टी-20 सामन्यात दमदार प्रत्युत्तर दिले. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 4.2 ओव्हर शिल्लक असताना भारतीय संघाने आठ विकेटने विजय मिळवला होता.

भारत-बांग्लादेश संघ खालील प्रमाणे आहे:

भारतः रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, लोकेश राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पंड्या, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर.

बांग्लादेश: सौम्या सरकार, मोहम्मद नैम, महमूदुल्लाह (कॅप्टन), आफिफ हुसेन, मोसद्देक हुसेन, अमीनुल इस्लाम, लिटन दास, मुशफिकुर रहीम, अराफत सनी, अल-अमीन-हुसेन, मुस्तफिजुर रहमान, शैफुल इस्लाम, अबू हैदर रोनी, मोहम्मद मिथुन, तैजुल इस्लाम.


Show Full Article Share Now