India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारतीय संघाचा श्रीलंका दौरा संपला आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाने टी-20 मालिका जिंकली. मात्र, वनडे मालिकेत यजमान श्रीलंकेने भारताचा 2-0 असा पराभव केला. श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता थेट 19 सप्टेंबरला मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाला बांगलादेशसोबत दोन कसोटी सामन्यांची आणि तीन टी-20 सामन्याची मालिका खेळायची आहे. पहिल्यांदा कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर, भारत आणि बांगलादेश टी-20 मालिकेत आमने सामने येणार आहेत. या सामन्याचे वेळापत्रक तुम्ही पीडीएफ (PDF) द्वारे विनामूल्य डाउनलोड करू शकता ज्यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे.
WTC पॉइंट टेबलमध्ये भारत सध्या पहिल्या स्थानावर
ही कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला दोन्ही सामन्यात बांगलादेशला पराभूत करून डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलवर आपली आघाडी मजबूत करायची आहे. पॉइंट टेबलमध्ये भारत सध्या पहिल्या स्थानावर आहे. (हे देखील वाचा: Most Century In World Test Championship: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टाॅप 5 फलदांज, वाचा कोण आहे ते दिग्गज खेळाडू)
टी-20 मालिकाही खेळवली जाणार
कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर भारत आणि बांगलादेश संघ टी-20 फॉरमॅटमध्येही आमनेसामने दिसणार आहेत. धर्मशाला येथे 6 ऑक्टोबरपासून दोन्ही देशांमधील टी-20 मालिका सुरू होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना 9 ऑक्टोबरला दिल्लीत तर शेवटचा सामना 12 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये खेळवला जाईल.
भारत आणि बांगलादेश मालिका वेळापत्रक
भारत विरुद्ध बांगलादेश पहिली कसोटी – चेन्नई (19 ते 23 सप्टेंबर)
भारत विरुद्ध बांगलादेश दुसरी कसोटी – कानपूर (27 ते 1 ऑक्टोबर)
भारत विरुद्ध बांगलादेश पहिला टी-20 सामना – धर्माशाला (6 ऑक्टोबर)
भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा टी-20 सामना – दिल्ली (9 ऑक्टोबर)
भारत विरुद्ध बांगलादेश तिसरा टी-20 सामना – हैदराबाद (12 ऑक्टोबर)