चेतेश्वर पुजारा आज रोहित शर्माप्रमाणे वेगवान फलंदाजी करीत आहे. त्याने 56 चेंडूत 41 धावा केल्या असून त्यात सात चौकारांचा समावेश आहे. दिवसाअखेरीस दोन्ही फलंदाज क्रीजवर नाबाद धावांवर खेळत आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने एका विकेट गमावून 86 धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या जोरावर बांग्लादेशकडे सध्या 64 धावांची आघाडी आहे.
IND 86/1 in 25 Overs | IND vs BAN 1st Test Day 1 Live Score Updates: बांग्लादेश 150 धावांवर ऑल आऊट, पहिल्या दिवसाखेर टीम इंडिया मजबूत स्थितीत
भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना आज (14 नोव्हेंबर) पासून इंदोरच्या होळकर स्टेडियम (Holkar Stadium) वर खेळला जाईल. टी-20 मालिकेतील पराभवानंतर बांग्लादेशचे संपूर्ण लक्ष टेस्ट मालिका जिंकण्याकडे असेल. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. मागील पाच सामने जिंकत टीम इंडिया गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये बांग्लादेशचा या मालिकेने प्रवास सुरू होईल. या मालिकेत बांग्लादेशचा संघ तमिम इक्बाल (Tamim Iqbal) आणि शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) यांच्याशिवाय खेळेल. तमिम आणि शाकिबशिवाय बांग्लादेशचा संघ थोडा कमकुवत दिसत आहे. भारत आणि बांग्लादेशमध्ये यापूर्वी नऊ टेस्ट सामने खेळले आहेत, त्यापैकी सात भारताने जिंकले आहेत, तर दोन पावसामुळे ड्रॉ झाले आहेत. दुसरीकडे, टीम इंडिया बांग्लादेशला हल्ल्यात घेण्याची चूक करणार नाही. बांग्लादेशने टी-20 मालिकेत भारताला चांगले आव्हान दिले होते, त्यामुळे टीम इंडिया बांग्लादेशविरुद्ध पूर्ण तयारीने खेळ करेल.
टीम इंडियाने आजवर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात बांग्लादेशवर वर्चस्व कायम ठेवले आहे. या मालिकेपूर्वी भारताने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी मालिकेत 3-0 आणि वेस्ट इंडिजविरूद्ध 2-0 अशी कसोटी मालिका जिंकली होती. आणि टीम इंडियाची पुन्हा एकदा क्लीनस्वीपवर नजर असेल. बांग्लादेशविरुद्ध ही मालिका जिंकत भारत टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयाची हॅटट्रिक लगावेल. बांग्लादेशचा सर्वोत्कृष्ट फलंदाज कर्णधार मोमीनुल हक याने कसोटी क्रिकेटमध्ये दहापेक्षा कमी शतकं केली आहेत. मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) आणि महमूदुल्लाह रियाध (Mahmudullah Riadh) हे चांगले क्रिकेटपटू आहेत, पण या स्वरूपात त्यांनी प्रभावी कामगिरी केली नाही आहे. दुसरीकडे, टीम इंडियाची नवी सलामी जोडी मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मा यांच्याकडे पुन्हा एकदा संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल.
असा आहे भारत आणि बांग्लादेशचा टेस्ट संघ:
टीम इंडिया: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, हनुमा विहारी, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत, कुलदीप यादव आणि उमेश यादव.
टीम बांग्लादेश: मोमीनुल हक (कॅप्टन), अल-अमीन-हुसेन, इम्रुल कायस, शादमन इस्लाम, सैफ हसन, महमूदुल्ला, मोसद्देक हुसेन, मेहेदी हसन, लिटन दास, मुश्फिकुर रहीम, मोहम्मद मिथुन, तैजुल इस्लाम, नईम हसन, मुस्तफिजुर रहमान आणि इबादत हुसेन.