IND vs BAN, 1st T20I Match Live Streaming: भारत विरुद्ध बांग्लादेश पहिला टी-20 लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर
भारत, बांग्लादेश (Photo Credit: Getty Images)

भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघात 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला समान दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियम (Arun Jaitley Stadium) मध्ये खेळला जाईल. या मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहली याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचे नेतृत्व करेल. मॅचआधी दिल्लीमधील प्रदूषण चर्चेचा विषय बनला आहे. दिल्लीमध्ये होणाऱ्या मॅचवर चाहते आणि जाणकारांनी मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही दिल्लीमध्ये सामना खेळवण्याची समर्थन करत आहेत, तर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा ने मॅचचे ठिकाण इतरत्र हलवण्याचा सल्ला दिला होता. पण, बीसीसीआयने याबाबत स्पष्ट भूमिका घेत मॅच दिल्लीमध्ये खेळवली जाईल हे स्पष्ट केले. भारताची घरच्या मैदानावरील ही दुसरी मालिका असेल. दक्षिण आफ्रिका आणि आता बांग्लादेशविरुद्ध भारतीय संघ आपली विजयी घोडदौड सुरु ठेवण्याचा प्रयत्न करेल. भारत-बांग्लादेशमध्ये आजवर 8 टी-20 सामने खेळले गेले आहेत. आणि यात भारताने वर्चस्व राखत सर्व सामने जिंकले आहेत. (IND vs BAN 1st T20I: रोहित शर्मा याला विराट कोहली याची बरोबरी करण्यासह 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड पुन्हा नोंदवण्याची संधी, वाचा सविस्तर)

पहिल्या टी-20 मॅचचं लाइव्ह प्रक्षेपण प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स (Star Sports) 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 एचडी इंग्रजी कॉमेंट्रीमध्ये आणि स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी हिंदी भाषामध्ये पाहता येईल. शिवाय, लाइव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग हॉटस्टार (Hotstar) वर उपलब्ध असेल.

भारताने या मालिकेसाठीदेखील भारतीय संघात युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. संजू सॅमसन (Sanju Samson) ला पुन्हा संघात स्थान मिळाले असून यष्टीरक्षक फलंदाजासाठी संघात आपले स्थान पक्क करण्याची ही सुवर्ण संधी असेल. संजूने विजय हजारे ट्रॉफीमध्ये दमदार फलंदाजी करत भारतीय संघात पुनरागमन केले. के एल राहुल (KL Rahul) यानेही संघात पुनरागमन केले आहेत. पण, विराटच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोणता फलंदाज येतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. दुसरीकडे, बांग्लादेशसाठीही यांचा दौरा महत्वाचा आहे. नियमित कर्णधार शाकिब अल हसन याच्यावर दोन वर्षाची बंदी घातल्यानंतर संघ कश्या प्रकारे खेळतो यावर सर्वांचे लक्ष लागून असेल.

बांग्लादेशविरूद्ध टी-20 मालिकेसाठी भारताची टीमः रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, क्रुणाल पंड्या, युजवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर.