India Tour of Sri Lanka 2021 Schedule: भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधी होणार वनडे व टी-20 मालिका
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

India Tour of Sri Lanka 2021 Schedule: श्रीलंकेत (Sri Lanka) होणार्‍या भारताच्या (India) सहा व्हाईट बॉल सामन्यांचे वेळापत्रक सोमवारी अधिकृत प्रसारकाद्वारे जाहीर करण्यात आले आहेत. भारतीय संघाच्या (Indian Team) श्रीलंका दौऱ्याची सुरुवात 13 जुलै रोजी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेने होईल तर अखेरचा सामना 19 जुलै रोजी खेळला जाईल. त्यांनतर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा पहिला सामना 21 जुलै रोजी आयोजित केला जाईल. बीसीसीआयने  (BCCI) अद्याप बहुप्रतिक्षित मालिकेसाठी संघ जाहीर केलेला नाही आहे. तथापि, सध्या इंग्लंडमध्ये कसोटी संघासोबत असलेल्या रवि शास्त्री यांच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यावर राहुल द्रविड संघाचे प्रशिक्षक असतील याची चर्चा रंगली आहे. शिवाय, या बहुचर्चित दौऱ्यावर टीम इंडियाच्या (Team India) नेतृत्वाची धुरा कोणत्या खेळाडूला मिळते याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या शिखर धवन आणि हार्दिक पांड्या या मर्यादित ओव्हर क्रिकेटच्या धाकड फलंदाजांच्या नावांची चर्चा आहे मात्र अखेर संघाचे नेतृत्व कोण करते याबाबत लवकरच घोषणा केली जाईल. (India Tour of Sri Lanka 2021: भारताला Rahul Dravid यांनी बनवले आहे वर्ल्ड चॅम्पियन, या गुणांमुळे BCCI ‘सुपरहिट’ प्रशिक्षकावर लावू शकते दाव)

दरम्यान, यजमान श्रीलंका आणि टीम इंडियामधील मालिकेच्या खेळांच्या ठिकाणांची अद्याप घोषणा केलेली नाही. इतकंच नाही तर एकाच वेळी दोन देशांमध्ये वेगवेगळे संघ खेळतील तेव्हा ही एक विरळ घटना असेल. विराट कोहलीच्या नेतृत्वातील संघ यादरम्यान इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तयारी करणार आहे. न्यूझीलंड विरोधात 18 जूनपासून होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यासाठी कसोटी संघ इंग्लंडमध्ये असून यजमान संघाविरुद्ध मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह कसोटी संघ आधीच युकेमध्ये आहे. दुसरीकडे, श्रीलंका दौऱ्यासाठी धवन, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ईशान किशन, नवदीप सैनी आणि कुलदीप यादव यांना स्थान मिळण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने काही खेळाडूंसाठी हा दौरा महत्वाचा असणार आहे.

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक

13 जुलै- पहिला वनडे

16 जुलै- दुसरा वनडे

18 जुलै- तिसरा वनडे

21 जुलै- पहिला टी-20

23 जुलै- दुसरा टी-20

25 जुलै- तिसरा टी-20