IND vs SL (Photo Credit - X)

How To Watch IND vs SL 1st T20I: भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारताला 27 जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. टी-20 मालिकेनंतर दोन्ही संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही एकमेकांविरुद्ध भिडतील. टी-20 मालिकेतील पहिला सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, श्रीलंकेत खेळवला जाईल. सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. अशा स्थितीत नव्या कर्णधारासह भारतीय संघाला मालिकेत अप्रतिम कामगिरी करायला आवडेल. दरम्यान, चाहत्यानां या सामन्याचा आनंद कुठे घेता येणार आहे याबद्दल आपण या लेखाद्वारे जाणून घेवूया...(हे देखील वाचा: IND vs SL 1st T20I Pitch Report: पल्लेकेले स्टेडियमच्या खेळपट्टीवर कोणाला मिळणार मदत फलंदाज की गोलंदाज? येथे जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल)

कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर टीव्हीवर पाहू शकता. जर तुम्हाला या मालिकेचे सामने मोबाईलवर पहायचे असतील तर तुम्ही ते सोनी लाईव्ह ॲपवर पाहू शकता. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये चाहत्यांना या मालिकेचा आनंद घेता येईल. मात्र, मोबाईलवर सामना पाहण्यासाठी चाहत्यांना सोनी लाईव्हचे सदस्यत्व घ्यावे लागेल. या सर्वांशिवाय तुम्ही टीव्हीवर डीडी नॅशनलवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिका सामना देखील अनुभवू शकता.

टी-20 सामन्याचे वेळापत्रक

पहिला टी-20 सामना, 27 जुलै 2024, पल्लेकेले, संध्याकाळी 7 वाजता (भारतीय वेळेनुसार)

दुसरा टी-20 सामना, 28 जुलै 2024, पल्लेकेले, संध्याकाळी 7 वाजता

तिसरा टी-20 सामना, 30 जुलै 2024, पल्लेकेले, संध्याकाळी 7 वाजता

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा टी-20 संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रवी बिश्रणोई. अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज