India Squad SA Series: रोहित शर्माचा ‘यू-टर्न’; दक्षिण आफ्रिका T20 मालिकेत शिखर धवनसह ‘हा’ धाकड अष्टपैलू भारताचे नेतृत्व करण्याचा प्रबळ दावेदार
हार्दिक पांड्या आणि शिखर धवन (Photo Credit: Twitter/BCCI)

IND Squad for SA Series 2022: भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आयपीएलच्या (IPL) 2022 सीझननंतर ब्रेक घेण्याच्या निर्णयावर यू-टर्न घेतला आहे. रोहितसह विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांना दक्षिण आफ्रिके (South Africa Series) विरुद्धच्या मायदेशात होणार्या टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्याची शक्यता आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) भारताचे नेतृत्व करेल तर हार्दिक पांड्याही (Hardik Pandya) नेतृत्व पदाच्या रिंगणात उतरला आहे. IPL 2022 संपल्यानंतर, टीम इंडिया आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची T20 मालिका खेळायची आहे. टी-20 मालिकेसाठी लवकरच संघाची घोषणा करण्यात येणार आहे. भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना टी-20 मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. याशिवाय भारताला जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) रवाना होणार असल्यामुळे आयपीएलनंतर खेळाडूंना काही वरिष्ठ खेळाडूंना टी-20 मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. (IND vs SA Series 2022: टीम इंडियावर दुखापतीचे ग्रहण; निवडकऱ्यांची डोकेदुखी वाढली, 5 स्टार खेळाडू दक्षिण आफ्रिका मालिकेला मुकणार, वाचा सविस्तर)

“सर्व वरिष्ठ भारतीय खेळाडूंना किमान साडेतीन आठवडे पूर्ण विश्रांती मिळेल. रोहित, विराट, केएल, ऋषभ आणि जसप्रीत हे तिघेही व्हाईट-बॉल मालिकेनंतर ‘पाचव्या कसोटी’साठी थेट इंग्लंडला जातील. इंग्लंड मालिकेसाठी आम्हाला आमचे सर्व प्रमुख खेळाडू ताजेतवाने राहण्याची गरज आहे,” असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने पीटीआयला सांगितले. बीसीसीआय आणि निवडकर्त्यांसाठी जुलैमधील इंग्लंड दौरा, विशेषत: अपूर्ण ‘पाचवी कसोटी’ हे प्राधान्य आहे. सलग क्रिकेटमुळे BCCI ने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 जूनपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी बहु-स्वरूपातील खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत अनुभवी सलामीवीर शिखर धवन नेतृत्वाची धुरा सांभाळणार असल्याचे सध्या समजले जात आहे. पण IPL 15 मध्ये गुजरात टायटन्सच्या नेतृत्वाने सर्वांना प्रभावित करणारा हार्दिक पांड्या, दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या T20I मालिकेतील नेतृत्वाच्या भूमिकेसाठी देखील दावेदार मानला जात आहे.

“निवडकर्त्यांकडे दोन पर्याय आहेत. गेल्या वर्षीच्या श्रीलंका मालिकेत विराट, रोहित आणि राहुलच्या अनुपस्थितीत शिखर धवनने भारताचे नेतृत्व केले आहे. पण गुजरात टायटन्ससाठी हार्दिक पांड्याच्या प्रभावी नेतृत्वाकडे दुर्लक्ष झाले नाही. त्यामुळे तो जवळचा दावेदार असेल,” सूत्राने पुढे म्हटले. प्रोटीज विरुद्ध टी20 मालिका 9 जून रोजी राष्ट्रीय दिल्लीत सुरू होईल आणि उर्वरित सामने अनुक्रमे कटक, विशाखापट्टणम, राजकोट आणि बेंगलोर येथे खेळले जातील.