IND vs SA 1st T20I: भारतीय संघ आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला (T20 Series) सुरुवात करणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया मागील ऑस्ट्रेलिया मालिकेपेक्षा थोडी वेगळी दिसणार आहे. मालिकेतील पहिला सामना रविवारी डर्बन येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाची कमान सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) सोपवण्यात आली आहे. या मालिकेत पुन्हा एकदा युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. ज्यांनी टीम इंडियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेत आपल्या कामगिरीने चर्चेत आले होते. मात्र या तरुणांची खरी परीक्षा दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर होणार आहे. येथील वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर सर्वांच्या नजरा सूर्यकुमार यादवच्या युवा सेनेच्या खेळाडूंवर असतील.

कधी आणि कुठे घेणार सामन्याचा आनंद?

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर चाहत्यांना पहिल्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंगही पाहता येईल. (हे देखील वाचा: IND vs SA 1st T20: पहिल्या टी-20 मध्ये कोण ओपनिंग करणार? कॅप्टन SuryaKumar Yadav म्हणाला- निर्णय झाला आहे...)

टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर .