![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/shubman-gill-17-.jpg?width=380&height=214)
India National Cricket Team vs England Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना (IND vs ENG 3rd ODI 2025) आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) खेळला जात आहे. भारताने आधीच 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात इंग्लंडला आपला सन्मान वाचवण्याची संधी असेल. तर भारताला इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची संधी असेल. दरम्यान, इंग्लंड संघाने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडला 357 धावांचे लक्ष्य दिले आहे.
𝐈𝐧𝐧𝐢𝐧𝐠𝐬 𝐁𝐫𝐞𝐚𝐤: An excellent batting performance has propelled #TeamIndia to 356-10, the second-highest ODI total at the Narendra Modi Stadium. Shubman Gill (112) struck an elegant century while Shreyas Iyer (78) and Virat Kohli (52) contributed with half-centuries.… pic.twitter.com/wqSVpYlV02
— BCCI (@BCCI) February 12, 2025
शुभमन गिलने झळकावले शानदार शतक
नाणेफेक गमावल्यानंतर भारताने निर्धारित 50 षटकांत 356 धावा केल्या आणि सर्वबाद झाले. सलामीवीर शुभमन गिलने त्याचे सातवे एकदिवसीय शतक झळकावले. त्याने 102 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 112 धावांची खेळी केली. विराट कोहली (52) आणि श्रेयस अय्यर (78) यांनी अर्धशतके झळकावली. गिलने कोहलीसोबत 116 धावांची आणि अय्यरसोबत 104 धावांची भागीदारी केली. (हे देखील वाचा: IND vs ENG, 3rd ODI: शुभमन गिलने रचला इतिहास; एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 2500 धावा करणारा बनला फलंदाज)
आदिल रशीदने घेतल्या सर्वाधिक चार विकेट्स
दुसरीकडे, मार्क वूडने इंग्लंड संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. इंग्लंडकडून स्टार गोलंदाज आदिल रशीदने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. आदिल रशीद व्यतिरिक्त मार्क वूडने दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंड संघाला 50 षटकांत 357 धावा कराव्या लागतील. इंग्लंड संघ तिसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिकेतील आपला सन्मान वाचवू इच्छितो.