Australia Men's National Cricket Team vs Indian National Cricket Team: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील द गाबा येथे खेळवला जात आहे. आज खेळाचा पाचवा दिवस आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 74.5 षटकांत 9 विकेट गमावून 252 धावा केल्या होत्या. मात्र, पाचव्या दिवशी भारतीय संघ 78.5 षटकांत 260 धावांवर गारद झाला. यासह ऑस्ट्रेलियाने 185 धावांची आघाडी मिळवली. पहिल्या डावात केएल राहुलने भारताकडून सर्वाधिक 84 धावा केल्या. तर रवींद्र जडेजाने 77 धावांचे योगदान दिले.
The 47-run last-wicket stand has been broken, and Australia will come out to bat once again!https://t.co/PupB4ooHCb #AUSvIND pic.twitter.com/AjOvav7w4D
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 18, 2024
कर्णधार पॅट कमिन्सने घेतल्या सर्वाधिक 4 विकेट
याशिवाय यशस्वी जैस्वालने 4 धावा, शुभमन गिलने 1 धावा, विराट कोहली 3 धावा, ऋषभ पंत 9 धावा, रोहित शर्मा 10 धावा, आकाश दीप 31 धावा आणि नितीश कुमार रेड्डी ने 16 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या आहेत. मिचेल स्टार्कने 3, जोश हेझलवूडला 1, नॅथन लियॉन आणि ट्रॅव्हिस हेडला 1 विकेट मिळाली. (हे देखील वाचा: IND vs AUS 3rd Test 2024 Day 4: फॉलोऑनचा धोका टाळताच विराट कोहली आणि गौतम गंभीर आक्रमक सेलिब्रेशन, ड्रेसिंग रूममधील व्हिडिओ व्हायरल)
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केल्या 445 धावा
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी पहिल्या डावात शतकी खेळी खेळली. ट्रॅव्हिस हेडने 160 चेंडूत 152 धावांची जबरदस्त खेळी केली. या खेळीत हेडने 18 चौकार मारले. तर स्मिथने 190 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या.
बुमराहने घेतल्या सहा विकेट
याशिवाय यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीने 70 धावा, उस्मान ख्वाजा 21 धावा, पॅट कमिन्स 20 धावा, मिचेल स्टार्क 18 धावा, नॅथन मॅकस्वीनी 9 धावा, मार्नस लॅबुशेन 12 धावा आणि मिचेल मार्शने 5 धावा केल्या. भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी करत आपले पंजे उघडले. बुमराहने 28 षटकात 76 धावा देत 6 बळी घेतले. तर मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि नितीश रेड्डी यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.