ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेमध्ये (Test Series) दुसरा सामना जिंकून भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम फेरीच्या दिशेने धाव सुरु ठेवली आहे. पुढच्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे. बुधवारी आयसीसीने (ICC) जारी केलेल्या अंकतालिकेनुसार, भारत चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. (IND Vs AUS 2nd Test: भारताकडून मिळालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाला अजून एक मोठा धक्का; आयसीसीने ठोठावला सामना शुल्काचा 40 टक्के दंड)
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 8 गडी राखून विजय मिळवत भारताने 3076.6 गुण प्राप्त केले आहेत. भारताची एकूण गुणसंख्या 390 झाली असून 72.2 अशी टक्केवारी आहे. भारताविरुद्ध बॉक्सिंग डे टेस्ट हरल्यानंतर सुद्धा ऑस्ट्रेलिया गुणतालिकेमध्ये प्रथम स्थानी आहे. 322 गुणांसह 76.6 टक्क्यांची कमाई करत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थान कायम ठेवले आहे. बुधवारी, पाकिस्तानला 101 धावांनी पराभूत करुन न्यूझीलंडने तिसरे स्थान गाठले आहे. या विजयामध्ये न्यूझीलंडला 60 गुण मिळाले असून त्यांची टक्केवारी 66.7 टक्के इतकी झाली आहे. इंटरनॅशनल टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंकतालिकेत पाकिस्तान आणि इंग्लंडचा टॉप 5 मध्ये समावेश आहे.
गुणांच्या आधारावर भारताने या चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केले आहेत. परंतु, कोविड-19 च्या संकटामुळे आयसीसीने गुणांऐवजी टक्केवारींवरुन अंकतालिका ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. चॅम्पियनशीप संपल्यानंतर पहिल्या दोन संघांमध्ये अंतिम सामना होईल.
दरम्यान, भारताविरुद्ध बॉक्सिंग डे टेस्ट हरल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघात बदल करण्यात आले आहेत. फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करु न शकणाऱ्या जो बर्न्स ला विश्रांती दिली असून डेव्हिड वॉर्नर आणि विल पुकोवस्की यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नर पहिल्या दोन टेस्ट खेळू शकला नाही. सराव सामन्यात दुखापत झाल्यामुळे विल पुकोवस्की सुद्धा टीमबाहेर होता. भारताकडून रोहित शर्माला तिसऱ्या टेस्टमध्ये संधी मिळण्याची आशा आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा तिसरा सामना 7 जानेवारी पासून सिडनी क्रिकेट ग्राऊंड येथे होणार आहे.