ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 2nd टेस्ट, एमसीजी (Photo Credit: PTI)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia 2nd Test) यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या  मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताकडून दारूण पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघाला आता आणखी एक धक्का बसला आहे. टिम पेन (Tim Paine) याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला प्रथम भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला आणि नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) संघावर मोठा दंड ठोठावला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने ऑस्ट्रेलियाच्या संघाला दंड ठोठावला आहे. आयसीसीने ऑस्ट्रेलियाच्या संघाला 40 टक्के सामना शुल्काचा दंड ठोठावला आहे.

पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. या सामन्यात अजिंक्य राहाणे यांच्या शतकी खेळी करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. मात्र, दुसऱ्या सामन्यात दारूण पराभव झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला आयीसीने झटका दिला आहे. टिम पेन याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने निश्चित वेळेत गोलंदाजी पूर्ण केली नाही. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ऑस्ट्रेलियाच्या संघावर मोठा दंड ठोठावला आहे. हे देखील वाचा- IND vs AUS 2nd Test 2020: टीम इंडिया अशाप्रकारे करतेय ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा, पहा Photos

एएनआयचे ट्विट-

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीला सिडनी क्रिकेट ग्राऊंड खेळला जाणार आहे. त्याचबरोबर शेवटचा कसोटी सामना 15 जानेवारीला ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंडवर पार पडणार आहे.