IND vs AUS 2nd Test 2020: टीम इंडिया अशाप्रकारे करतेय ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा, पहा Photos
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs AUS 2nd Test 2020: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेची सुरुवात टीम इंडियासाठी चांगली झाली नसली तरी संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दणक्यात पुनरागमन करत यजमान ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला. अ‍ॅडिलेड येथील पहिल्या पिंक-बॉल टेस्ट सामन्यात पराभवानंतर टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात जबरदस्त पुनरागमन केलं आणि कांगारू संघाला 8 विकेटने धूळ चारली. कर्णधार अजिंक्य रहाणेचे शतक, रवींद्र जडेजाचे अर्धशतक आणि गोलंदाजांचा भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन टीमने लोटांगण घातलं. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सामन्याच्या चौथ्या दिवशी मिळवलेल्या विजयानंतर टीम इंडिया खेळाडू संध्या आनंद साजरा करण्यात मग्न आहेत. सामना संपल्यावर खेळाडूंनी ट्विटरद्वारे विजयाच्या निमित्ताने पोस्ट शेअर केली आणि खास मेसेज देखील लिहिला. (IND vs AUS Boxing Day Test 2020: अजिंक्य रहाणेने मिळवला पहिला मान, मानाचे Mullagh Medal पटकावणारा पहिला खेळाडू)

उत्साहपूर्ण कामगिरी आणि संघाकडून शानदार पुनरागमन.

संपूर्ण टीमचे  अभिनंदन

आठवणीतला विजय!

टीमकडून जोरदार प्रदर्शन

टीम इंडिया

बॉक्सिंग डे चॅलेंज जिंकला

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ पुढील वर्षी, 2021 मध्ये सिडनी क्रिकेट ग्राउंडवर तिसऱ्या कसोटी सामन्यात आमने-सामने येतील. 7 जानेवारीपासून दोन्ही संघात हा सामना खेळला जाईल. मेलबर्नमधील सामना जिंकत टीम इंडियाने मैकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे, त्यामुळे आगामी तिसरा सामना मनोरंजनक ठरेल कारण दोन्ही संघ सामन्यात विजय मिळवून विजयाच्या एक पॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलिया संघात अनुक्रमे रोहित शर्मा आणि डेविड वॉर्नर तिसऱ्या सामन्यासाठी सामील होण्याची चिन्हे दिसत आहेत. वॉर्नर आणि रोहित दोघे दुखापतीतून क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहेत.