IND vs PAK (Photo Credit - Twitter)

IND vs PAK Asia Cup Super 4: कोलंबो येथील आशिया चषक (Asia Cup 2023) च्या सुपर 4 टप्प्यातील सर्वात चर्चेत असलेला सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan), जो 10 सप्टेंबरला होणार आहे. यापूर्वी, श्रीलंकेत होणारे सर्व सुपर 4 सामने हंबनटोटा येथे हलवले जातील असे वृत्त होते, परंतु नंतर आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) स्पष्ट केले की सामने कोलंबोमध्येच होतील. पण, कोलंबोची सर्वात मोठी समस्या अजूनही पावसाची आहे. (IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 'या' दिग्गज खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष, आपल्या कामगिरीने करू शकतात कहर)

कोलंबोमधील हवामान

वास्तविक, सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याची 90 टक्के शक्यता असते, त्यामुळे नक्कीच पाऊस पडेल आणि खेळ खराब होईल असे समजून चालू. पण मिळालेल्या माहितीनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-4 फेरीच्या सामन्यात पाऊस खलनायक ठरला, तर त्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. हा सामना 10 सप्टेंबरला पूर्ण झाला नाही तर 11 सप्टेंबरला पूर्ण होईल. मात्र, हंबनटोटा येथील हवामानाचा अंदाज सध्या चांगला असल्याचे सांगण्यात येत आहे.

ग्रुप स्टेजमधील मॅच करण्यात आली रद्द 

पल्लेकेले येथे शनिवारी भारत-पाकिस्तान आशिया कप गटातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने इशान किशन आणि हार्दिक पांड्याच्या अर्धशतकाच्या जोरावर 266 धावा केल्या. टीम इंडिया 48.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट झाली पण पाकिस्तान बॅटिंग करण्यापूर्वीच पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर मॅच पुन्हा सुरू होऊ शकली नाही.