AUS Team (Photo Credit - X)

Australian Men's Cricket Team vs India National Cricket Team: ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND s AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 (Border-Gavaskar Trophy 2024-25) मालिकेतील चौथा बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताचा 184 धावांनी पराभव केला आहे. यासह यजमान संघानी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. (हे देखील वाचा: Pat Cummins New Record: रोहित शर्माची विकेट घेऊन पॅट कमिन्सने रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला कर्णधार)

भारताचा 13 वर्षांनंतर मेलबर्नमध्ये पराभव

13 वर्षांनंतर मेलबर्नमध्ये टीम इंडियाचा हा कसोटी पराभव आहे. याआधी भारतीय संघ 2011 मध्ये पराभूत झाला होता. भारताला विजयासाठी पाचव्या दिवशी 340 धावांचे लक्ष्य मिळाले होते. भारत एकतर हा सामना ड्राॅ करु शकत होता. पण कांगारुच्या गोलंदाजी समोर कोणताही भारतीय फलंदाज टीकू शकला नाही. आणि टीम इंडिया शेवटच्या दिवशी 79.1 षटकात 155 धावांवर ऑलआऊट झाली.

येथे पाहा संपूर्ण स्कोरकार्ड

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 474 आटोपला

पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 4 फलंदाजांच्या अर्धशतक आणि स्टीवन स्मिथच्या 140 धावांच्या जोरावर दुसऱ्या दिवशी 474 धावांवर केल्या. सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर कॉन्स्टास 60 आणि उस्मान ख्वाजा 57 धावा करून बाद झाला. मार्नस लॅबुशेन 72 धावा करून बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्टीव्हन स्मिथ पॅट कॅमिन्स यांनी 112 धावांची भागीदारी रचली. पॅट कॅमिन्स 40 आणि स्मिथ 140 धावा करुन बाद झाला. भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने 4 तर रवींद्र जडेजाने 3 बळी घेतले. याशिवाय आकाश दीप 2 आणि वॉशिंग्टन सुंदरनेही एक विकेट घेण्यात यश मिळवले.

भारताचा पहिला डाव चौथ्या दिवशी 369 धावांवर गारद

यानंतर प्रत्युत्तरात भारतीय डावाला सुरुवात झाली. सुरुवात चांगली झाली नाही, यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांच्यात शतकी भागीदारी झाली, पण यशस्वी धावबाद होताच विराट कोहलीही चालायला लागला. रोहित शर्माची बॅट पुन्हा फ्लॉप झाली. केएल राहुल उत्कृष्ट चेंडूवर बाद झाला. यशस्वी जैस्वालच्या बॅटमधून 82 धावा निघाल्या. तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत 28, रवींद्र जडेजा 17 धावांवर स्वस्तात बाद झाले. त्यानंतर नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी हातात कमान घेतली. दोघांनी 127 धावांची भागीदारी रचली. वॉशिंग्टन सुंदर 162 चेंडूचा सामना करुन 50 धावा करुन बाद झाला. आणि नितीश कुमार रेड्डीने शानदार शतक झळकावले. त्यानंतर चौथ्या दिवशी भारताला शेवटचा धक्का त्याच्या रुपात लागला आणि भारताचा पहिला डाव चौथ्या दिवशी 369 धावांवर आटोपला. यासह ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 105 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून कमिन्स, बोलंड आणि लायन यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 234 धावांवर मर्यादित

पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 83.4 षटकांत 234 धावांवर मर्यादित राहिला. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात मार्नस लॅबुशेनने सर्वाधिक 70 धावा केल्या. लॅबुशेनशिवाय कर्णधार पॅट कमिन्सने 41 आणि नॅथन लिऑनने 41 धावांचे योगदान दिले. सॅम कोन्स्टासने 8 धावा, उस्मान ख्वाजाने 21 धावा, ट्रॅव्हिस हेडने 1 धावा आणि स्टीव्हन स्मिथने 13 धावा केल्या. दुसऱ्या डावात टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराहने 24.4 षटकात 57 धावा देत 5 आणि मोहम्मद सिराजने 4 बळी घेतले. याशिवाय रवींद्र जडेजाने 1 बळी घेतला.

भारताला विजयासाठी मिळाले 340 धावांचे लक्ष्य 

यजमानांनी भारतासमोर विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य ठेवले होते, या धावसंख्येसमोर टीम इंडिया 155 धावांवर ऑलआऊट झाली. भारताकडून यशस्वी जैस्वालने 208 चेंडूत 84 धावांची खेळी केली, मात्र तिसऱ्या पंचाच्या वादग्रस्त निर्णयामुळे त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. थर्ड अंपायरने त्याला स्निको मीटरमध्ये कोणतीही हालचाल न करता आऊट दिले. जैस्वाल व्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. दुसऱ्या सत्रापर्यंत भारताने केवळ तीन विकेट गमावल्या होत्या, शेवटच्या सत्रात कांगारूंनी 7 विकेट्स घेत सामना पूर्णपणे उलटवला. आता या मालिकेतील शेवटचा आणि पाचवा कसोटी सामना नवीन वर्षाच 3 जानेवारी सिडनीमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारत आता ही मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करेल.