IND U19 (Photo Credit - X)

Indian National Under-19 Cricket Team vs Sri Lanka National Under-19 Cricket Team, ACC U19 Asia Cup 2024 Live Score Update:  एसीसी अंडर-19 आशिया चषक 2024 चा दुसरा उपांत्य सामना आज भारतीय राष्ट्रीय अंडर-19 क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय अंडर-19 क्रिकेट संघ यांच्यात शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. ज्यात दोन विजय आणि एकात पराभव स्वीकारावा लागल आहे. दुसरीकडे श्रीलंकेचा संघही तीन सामने खेळून तिन्ही सामने जिंकले आहेत. ब गटातील गुणतालिकेत श्रीलंका संघ सहा गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. विजेता संघ अंतिम फेरीत पोहोचेल. दरम्यान, श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत भारताला विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य दिले आहे. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 173 धावांत गारद झाला आहे.

येथे पाहा स्कोरकार्ड

त्याआधी, दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार वीरन चामुदिथा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या आठ धावा करून संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 46.2 षटकांत अवघ्या 173 धावांत गारद झाला. श्रीलंकेसाठी लकविन अबेसिंघेने 69 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान लकविन अबेसिंघेने 110 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले. लक्विन अबेसिंघेशिवाय शरुजन षणमुगनाथनने 42 धावा केल्या.

चेतन शर्माने घेतल्या सर्वाधिक तीन विकेट

दुसरीकडे चेतन शर्माने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. टीम इंडियाकडून चेतन शर्माने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. चेतन शर्माशिवाय किरण चोरमले आणि आयुष म्हात्रे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 174 धावा करायच्या आहेत. टीम इंडियाला हा सामना जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करायचे आहे.