IND vs CAN T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) भारताचा सामना आज कॅनडासोबत (IND vs CAN) होणार आहे. भारताने याआधीच अमेरिका, पाकिस्तान आणि आर्यंलडचा पराभव करुन सुपर-8 मध्ये (Super-8) प्रवेश केला आहे. भारताचा हा ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता फ्लोरिडा येथे खेळवला जाईल. आजच्या सामन्यात भारताला आपल्या फलंदांजीची लय मिळवण्याचा प्रर्यंत करावा लागेल. कारण, तिन्ही सामन्यात भारतीय गोलंदांजांचा दबदबा पाहायला मिळाला आहे. दरम्यान, या सामन्याचा आनंद घेण्यासाठी चाहत्यांना कुठे सामना पाहावा लागणार आहे या लेखाद्वारे आपण जाणून घेवूया.. (हे दखील वाचा: ICC T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात 'या' गोलंदाजांनी दाखवली आपली दहशत, सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर घेतल्या विकेट)
कुठे होणार सामना?
टी-20 विश्वचषक 2024 मध्ये, भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियमवर खेळवला जाईल.
कधी होणार सामना?
भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना शनिवार, 15 जून रोजी फ्लोरिडामध्ये खेळला जाणार आहे, जो सकाळी 10:30 वाजता सुरू होईल. मात्र, भारतीय वेळेनुसार हा सामना भारतात रात्री आठ वाजता सुरू होईल.
With #TeamIndia already advancing in the Super 8 stage, Canada players share their favourite players to watch out for on the biggest stage! 🔥
Will @ImRo45 & Co. go into the Super 8 with a win against Canada? 🤨#INDvCAN | TODAY, 6 PM | #T20WorldCupOnStar pic.twitter.com/88cOlwURWU
— Star Sports (@StarSportsIndia) June 15, 2024
टीव्हीवर सामना कुठे प्रसारित केला जाईल?
भारतात, टी-20 विश्वचषक 2024 मध्ये भारत आणि कॅनडा यांच्यात खेळला जाणारा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे टीव्हीवर थेट प्रसारित केला जाईल.
मोबाईलवर 'फ्री' लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहायला मिळणार?
डिस्ने प्लस हॉटस्टारवर भारत आणि कॅनडा यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'फ्री' असेल. तथापि, केवळ मोबाइल वापरकर्ते विनामूल्य लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतील.
टी-20 विश्वचषकासाठी दोन्ही संघ
भारत: रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
कॅनडा: आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), रविंदरपाल सिंग, साद बिन जफर (कर्णधार), कलीम सना, डिलन हेलिगर, जुनैद सिद्दीकी, जेरेमी गॉर्डन, रेयान पठाण, निखिल दत्ता, ऋषीव राघव जोशी, दिलप्रीत बाजवा