India Women's National Cricket Team vs West Indies Women's Cricket Team, 1st T20I Match Scorecard Update: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 15 डिसेंबर रोजी खेळवला जात आहे. उभय संघांमधील हा सामना नवी मुंबईतील (Navi Mumbai) डॉ.डी.वाय.पाटील स्पोर्ट्स अकादमीत (Dr DY Patil Sports Academy) खेळला जात आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपेक्षेप्रमाणे राहू शकला नाही, जिथे त्यांना 0-3 असा पराभव पत्करावा लागला. या मालिकेत टीम इंडियाची कमान हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) खांद्यावर आहे. तर, वेस्ट इंडिजचे नेतृत्व हेली मॅथ्यू (Hayley Matthews) करत आहे. (हेही वाचा - Mumbai Beat Madhya Pradesh, Syed Mushtaq Ali Trophy 2024: मुंबईचा संघ दुसऱ्यांदा ठरला सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचा चॅम्पियन, अंतिम फेरीत मध्य प्रदेशचा पाच गडी राखून केला पराभव)
पाहा पोस्ट -
IND-W 195/4 in 20 Overs#INDWvWIW | #INDvWI | #India | #WestIndies https://t.co/kGwsES7Puj
— LatestLY (@latestly) December 15, 2024
दरम्यान, पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात स्फोटक झाली आणि पहिल्या विकेटसाठी दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी अवघ्या 39 चेंडूत 50 धावा केल्या.
. टीम इंडियासाठी जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक 73 धावांची खेळी खेळली. या स्फोटक खेळीदरम्यान जेमिमाह रॉड्रिग्सने 35 चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकार ठोकले. जेमिमाह रॉड्रिग्जशिवाय स्मृती मानधनाने 54 धावा केल्या.
दुसरीकडे, करिश्मा रामहारिकने वेस्ट इंडिज संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. वेस्ट इंडिजकडून करिश्मा रामहारिकने सर्वाधिक दोन बळी घेतले. करिश्मा रामहारिकशिवाय डिआंड्रा डॉटिनने एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिज संघाला 20 षटकात 196 धावा करायच्या आहेत. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याची इच्छा आहे.