IND-W vs SA-W 1st T20I: सचिन तेंडुलकर ला पिछाडीवर करत शाफाली वर्मा ने रचला इतिहास, वाचा सविस्तर
शाफाली वर्मा (Photo Credit: Twitter)

भारतीय पुरुष क्रिकेट टीम सह, महिला देखील आता क्रिकेटच्या मैदानात उतरल्या आहेत. एकीकडे टीम इंडिया टी-20 मालिकेनंतर टेस्ट मालिकेत दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आपला दम दाखवण्यासाठी सज्ज आहे. तर, भारतीय महिला क्रिकेट संघाने (India Women's Cricket Team) हरमनप्रीत कौर च्या नेतृत्वात दक्ष आफ्रिका महिला संघाचाविरुद्ध पहिल्या टी-20 मालिकेत रोमांचक पराभव केला. या मॅचमध्ये भारताची फलंदाजी कमकुवत दिसली. कर्णधार हरमनप्रीत शिवाय, उपकर्णधार स्मृती मंधाना ने दुसऱ्या सर्वाधिक धावा केल्या. भारताने विजयासाठी 131 धावांचे लक्ष्य दिले होता. मात्र, गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत आफ्रिका संघाला 120 धावांवर रोखले. या मॅचमध्ये शाफाली वर्मा (Shafali Verma) ने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ला मागे टाकले.

शाफालीने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण केले. सचिनने वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तर शाफाली फक्त 15 वर्षाची आहे. माजी कर्णधार मिथाली राज च्या निवृत्तीनंतर शाफालीला भारतीय संघात स्थान देण्यात आले. पण तिचा पहिला सामान संस्मरणीय राहिला नाही. कारण पहिल्या मॅचमध्ये तिला खातेही उघडता आले नाही. या पदार्पणामुळे शाफाली टी-20मध्ये सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी भारताची पहिली क्रिकेटपटू ठरली. शिवाय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात युवा वयात पदार्पण करणाऱ्यांच्या यादीत ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिच्याआधी गार्गी बॅनर्जी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी सर्वात कमी वयाची खेळाडू होती.

गार्गीने 1978 मध्ये वयाच्या 14 वर्षांनी 165 दिवसांत वनडेमध्ये पदार्पण केले होते तर, सचिनने 30 वर्षांपूर्वी वयाच्या 16 वर्षांच्या 238 दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. दुसरीकडे, याच मॅचमध्ये मालिका अष्टपैलू दीप्ति शर्मा (Deepti Sharma) आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात तीन मेडन ओव्हर टाकणारी पहिली भारतीय महिला ठरली. दीप्तीच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारताने संपूर्ण मॅच आपले वर्चस्व बनवून ठेवले होते. दीप्तीने फक्त 8 धावा देत 3 गडी बाद केले. दीप्तीच्या चार ओव्हरपैकी पहिले तीन तिने मेडन टाकले. यासह दीप्ती टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन मेडन ओव्हर टाकणारी पहिला भारतीय महिला गोलंदाज ठरली.