भारत महिला टीम (Photo Credit: PTI)

IND-W vs NZ-W Series 2022: न्यूझीलंडमध्ये (New Zealand) यावर्षी आयसीसी महिला विश्वचषक (Women's World Cup) खेळला जाणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना झाला आहे. न्यूझीलंडच्या व्हाईट फर्न्स (White Ferns) आणि टीम इंडियामध्ये (Team India) मर्यादित षटकांची मालिका रंगणार आहे. दोन्ही संघ 9 फेब्रुवारीपासून एक टी-20 आणि पाच सामन्यांची वनडे मालिका एकमेकांशी भिडणार आहे. न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीचा भाग म्हणून ही मालिका दोन्ही संघासाठी महत्वाची असणार आहे. यापूर्वी कोविड-19 चा धोका कमी करण्यासाठी या मालिकेतील सर्व सामने क्वीन्सटाउन (Queenstown) येथे खेळले जाणार असल्याचे न्यूझीलंड क्रिकेटने नुकतंच जाहीर केलं. टीम इंडियाने शेवटचा आंतरराष्ट्रीय दौरा गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळला  होता आणि त्यात पिंक-बॉल कसोटीचाही समावेश होता. White Ferns विरुद्ध भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. (NZ-W vs IND-W Series 2022: भारताविरुद्ध न्यूझीलंडच्या महिला White Ferns च्या मालिकेच्या कोविड-19 मुळे झाला ‘हा’ बदल)

न्यूझीलंड महिला वि भारत महिला मालिका शेड्युल

9 फेब्रुवारी: एकमेव टी-20, क्वीन्सटाउन, सकाळी 5:30 वाजता

11 फेब्रुवारी: पहिला वनडे, क्वीन्सटाउन, सकाळी 6:30 वाजता

14 फेब्रुवारी: दुसरी वनडे, क्वीन्सटाउन, सकाळी 6:30 वाजता

16 फेब्रुवारी: तिसरी वनडे, क्वीन्सटाउन, सकाळी 6:30 वाजता

22 फेब्रुवारी: चौथी वनडे, क्वीन्सटाउन, सकाळी 6:30 वाजता

24 फेब्रुवारी: पाचवी वनडे, क्वीन्सटाउन, सकाळी 6:30 वाजता

टीम इंडिया T20 संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह ठाकूर, तानिया भाटिया (यष्टीरक्षक) ), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, एकता बिश्त, एस. मेघना, सिमरन दिल बहादूर.

टीम इंडिया वनडे संघ: मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह ठाकूर, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव.

स्टँडबाय खेळाडू: सभिनेनी मेघना, एकता बिष्ट, सिमरन दिल बहादूर.