IND-W vs NZ-W ODI 2022: भारतीय महिला क्रिकेट संघ (India Women's Cricket Team) सध्या मर्यादित षटकांच्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. एकमेव टी-20 सामना गमावल्यानंतर आता टीम इंडियाला यजमान व्हाईट-फर्न्स (White Ferns) विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. 50 षटकांच्या मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली आहे. ओपनर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिचे पहिल्या वनडे मॅचमध्ये खेळणे देखील शक्य नाही. असे सांगितले जात आहे की स्मृती अजूनही दोन अन्य खेळाडूंसह क्राइस्टचर्चमध्ये मॅनेज्ड आयसोलेशन आणि क्वारंटाईन (MIQ) मध्ये आहे आणि टी-20 सामन्यातून बाहेर पडल्यानंतर आता तिच्यावर सलामीच्या वनडे सामन्यातून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे.
स्मृतीसाग भारतीय महिला वेगवान गोलंदाज मेघना सिंह आणि रेणुका सिंह देखील MIQ मध्ये आहेत. त्यांचा क्वारंटाईन कालावधी का वाढवला हे कळू शकलेले नाही. पहिला एकदिवसीय सामना शनिवारी होणार आहे. एकमेव T20 सामन्यात भारताचा 18 धावांनी पराभव झाल्यानंतर फलंदाज यास्तिका भाटिया पत्रकार परिषदेत म्हणाले, “स्मृती, मेघना आणि रेणुका सिंह न्यूझीलंड सरकारने अनिवार्य केलेल्या एमआयक्यूमध्ये आहेत.” मंधानाच्या अनुपस्थितीत भाटिया आणि शेफाली वर्माची जोडी सलामीला उतरली. परिस्थितीबद्दल विचारले असता भाटिया म्हणाली, “वारा खूप जोरात वाहत आहे आणि आम्हाला त्यानुसार शॉट्स खेळावे लागतील. हा दौरा खूप महत्त्वाचा असून विश्वचषकपूर्वी येथे मालिका खेळल्यास आम्हाला खूप फायदा होईल.”
भारत आणि न्यूझीलंड महिला संघ 12 ते 20 फेब्रुवारीदरम्यान पाच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सर्व सामने क्वीन्सटाऊन येथील ओव्हल मैदानावर खेळवले जातील. मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.