Indian Women's National Cricket Team vs West Indies Women's Cricket Team Match Scorecard: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील (ODI Series) दुसरा सामना 24 डिसेंबर (मंगळवार) रोजी वडोदरा (Vadodara) येथील कोटंबी स्टेडियमवर (Kotambi Stadium) खेळला गेला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजच्या महिला संघाचा 115 धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. या सामन्यात, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 358/5 अशी मोठी धावसंख्या उभारली, जी वनडेतील त्यांची संयुक्त सर्वोच्च धावसंख्या देखील आहे. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 46.2 षटकांत सर्वबाद 243 धावांवर आटोपला. (हेही वाचा - Smriti Mandhana ICC Rankings: स्मृती मंधानाच्या दमदार कामगिरीबद्दल ICC ने रिटर्न गिफ्ट दिले, क्रमवारीत घेतली मोठी झेप)
हरलीन देओलने भारतीय संघाच्या फलंदाजीत चमकदार कामगिरी करत 103 चेंडूत 115 धावा केल्या. त्याच्या खेळीत 16 चौकारांचा समावेश होता. तिच्यासोबत प्रतिका रावलनेही उत्कृष्ट 76 धावा केल्या आणि स्मृती मानधना हिने 53 धावांची शानदार खेळी केली. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीत कायना जोसेफ (2 षटकांत 27 धावांत 1 बळी) आणि आफी फ्लेचर (6 षटकांत 38 धावांत 1 बळी) यांनी काहीशी चांगली कामगिरी केली.
झळकावले आणि 109 चेंडूत 106 धावा केल्या. मात्र, त्याला उर्वरित फलंदाजांची साथ मिळू शकली नाही. शमाइन कॅम्पबेलने 38 धावा केल्या, तर झायडा जेम्सने 25 धावांचे योगदान दिले. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. प्रिया मिश्राने 9.2 षटकात 49 धावा देत 3 बळी घेतले, तर प्रतिका रावल आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, भारतीय गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचा संघ जास्त काळ टिकू शकला नाही आणि भारतीय संघ 115 धावांनी मागे पडला. हा सामना 115 धावांनी जिंकून त्यांनी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.