क्रिकेट विश्वचषकच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला मागे सोडत भारतीय संघ (Indian Team) आत वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यासाठी सज्ज होत आहे. आगामी विंडीज दौऱ्यासाठी विराट कोहलीच (Virat Kohli) संघाचा कर्णधार असणार हे निवड समितीने स्पष्ट केले. विश्वचषकमधील पराभवानंतर वनडे आणि टी-20 संघाचे कर्णधारपद रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे देण्यात यावे असे विशेषज्ञ आणि चाहत्यांकडून बोलले जात होते. शिवाय कोहलीने देखील विंडीज दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला होता. पण काही कारणाने तो मागे घेत विराट आता या दौऱ्यावर तिन्ही मालिका खेळणार आहे. आणि त्यासाठी तो जय्यत तयारी करत आहे. (चायनाच्या 'Oppo' ऐवजी ही Byju's असणार टीम इंडियाचा मुख्य प्रायोजक, बीसीसीआयला देणार इतके करोड रुपये)
विंडीज दौऱ्यादरम्यान दोन्ही संघ 3 ती-20 सामने, 2 वनडे आणि 2 टेस्ट सामने खेळणार आहे. भारताचा विंडीज दौरा 3 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. दरम्यान, विराटने सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत विराटने आपल्या सकारात्मक दृष्टीकोनामागचे गुप्टिल सांगितले आहे. हा व्हिडिओ शेअर करताना विराट लिहितो की, "सकारात्मकता सकारात्मकतेल आकर्षित करते. तुमची निवडच तुमच्या परिणामाची व्याख्या करते." या व्हिडिओमध्ये विराट पिवळा टी-शर्ट आणि काळया रंगाचे जॅकेट घालून डान्स करताना दिसत आहे.
View this post on Instagram
Positivity attracts positivity. Your choice defines your outcome. 🙏😇 #BTS
दम्यान, आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची रविवारी घोषणा करण्यात आली होती. या दौऱ्यासाठी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर हा भारतीय संघाचे पहिला दौरा आहे. दुसरीकडे, हॉपर एचक्यू (Hopper HQ ) या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, क्रीडा प्रकारात इंस्ट्राग्रामवर सर्वाधिक कमाई करण्याच्या टॉप 10 व्यक्तींमध्ये विराट कोहली एकमेव क्रिकेटर आहे. विराट नवव्या क्रमांकावर आहे. विराटच्या एका पोस्टची कमाई हि त्याच्या कोणत्याही सामन्याच्या तब्बल 22 पट जास्त आहे. विराटला एका इंस्टाग्राम पोस्टमागे 1,96,000 डॉलर म्हणजेच 1 कोटी 35 लाख मिळतात.