वेस्ट इंडिजने (West Indies) दिलेल्या 316 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत टीम इंडियाने (India) कटकमधील तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात विजय नोंदवला आहे. टीम इंडियाने विंडीजने दिले लक्ष्य 4 विकेट आणि 7 चेंडू राखून गाठले. भारताने विंदजीविरुद्धही मालिका 2-1 ने जिंकली. यापूर्वी विंडीजने चेन्नई वनडेमध्ये आणि भारताने विशाखापट्टणममध्ये विजय मिळवला होता. भारताकडून लक्ष्याचा पाठलाग करत विराट कोहली (Virat Kohli) सह केएल राहुल (KL Rahul), रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी सर्वाधिक धावा केल्या. विराटने 85 धावा, राहुलने 77 आणि रोहितने 62 धावांची खेळी केली. रोहित 63 चेंडूत 63 धावा करून बाद झाला. बाद होण्यापूर्वी रोहितने 22 वर्षांचा विश्वविक्रम मोडला. त्याने एका वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या सनथ जयसूर्या यांचा विक्रम मोडला. 1997 मध्ये जयसूर्याने 2387 धावा केल्या ज्या रोहितने आता त्यांना मागे टाकले आहे. केएल राहुलने 89 चेंडूत 77 धावा केल्या. रिषभ पंतसुद्धा 7 धावा काढून बोल्ड झाला. केदार जाधवने 9 धावा केल्या आणि कोटरलकडून बोल्ड झाला. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) 39 आणि शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) 17 धावांवर नाबाद राहिले. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर, कोटरेल आणि अल्जरी जोसेफ यांनी 1-1 गडी बाद केले. किमो पॉलने दोन विकेट्स आपल्या नावावर केल्या.
दरम्यान, भारताचा विंडीजविरुद्ध हा सलग 10 वा मालिका विजय होता. तत्पूर्वी निकोलस पूरन आणि किरोन पोलार्ड यांच्या फलंदाजीमुळे भारतीय गोलंदाज असहाय झाले. पुरनने 89 धावा केल्या तर पोलार्ड 74 धावा करून नाबाद राहिला. वेस्ट इंडिजने अखेरच्या 10 षटकांत 118 धावा केल्या. या मॅचमध्ये भारताने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. इव्हिन लुईस 21, ती होप 42, रोस्टन चेस 38 आणि शिमरोन हेटमायर यांनी37 धावांचा उपयुक्त डाव खेळला. भारताकडून पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनी याने दोन विकेट असून मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा याने प्रत्येकी एक गडी बाद केला, शार्दुल ठाकूर यालाही एक विकेट मिळाली.
विराट ऐन मोक्याच्या क्षणी बाद झाला त्यावेळी 28 चेंडूत 38 धावांची गरज होती. कोहली बाद झाल्यावर शार्दूल ठाकूर फलंदाजीसाठी आला. त्याने जडेजाच्या साथीने दबावाखाली असलेल्या भारताला विजय मिळवून दिला. विराट ऐन मोक्याच्या क्षणी बाद झाला त्यावेळी 28 चेंडूत 38 धावांची गरज होती. कोहली बाद झाल्यावर शार्दूल ठाकूर फलंदाजीसाठी आला. त्याने जडेजाच्या साथीने दबावाखाली असलेल्या भारताला विजय मिळवून दिला. शार्दूलने 6 चेंडूंचा सामना करत 2 चौकार आणि 1 षटकार लगावत नाबाद 17 धावा केल्या. जडेजा आणि शार्दुल ठाकूरने 16 चेंडूत 30 धावांची भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला.