शिवम दुबे (Photo Credits: Twitter/BCCI)

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसर्‍या टी-20 सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli)मोठा प्रयोग केला आणि 26 वर्षीय युवा अष्टपैलू शिवम दुबे (Shivam Dube) याला तिसर्‍या क्रमांकावर स्वताःच्या जागी फलंदाजीसाठी पाठवले. शिवमनेही निराश केले नाही आणि अर्धशतकी खेळी करत प्रभावी कामगिरी केली. त्याने 27 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 50 धावा पूर्ण केल्या. बांग्लादेशविरुद्ध टी-20 मालिकेतून पदार्पण करणाऱ्या शिवमने 5 व्या टी-20 सामन्यात पहिल्यांदा अर्धशतक केले. तिरुअनंतपुरम टी-20 मॅचमध्ये दुबेला बढती देण्यात आली आणि तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविण्यात आले. दुबेने आपल्या द्रुत फलंदाजीने टी-20 स्वरूपाचा मास्टर म्हटल्या जाणाऱ्या किरोन पोलार्ड (Kieron Pollard) यालाही घाबरवले. सुरुवातीला, त्याला थोडा संघर्ष करावा लागला कारण चेंडू योग्यरित्या बॅटवर येत नव्हता. पण हळूहळू तो फॉर्ममध्ये आला. पोलार्डसह त्याचा मैदानावर वाद झाला त्याच्यानंतर त्याने असे काही केले जे पाहून सर्व चाहत्यांनी त्याचे कौतुक केले. (IND vs WI 2nd T20I: शिवम दुबे याची अर्धशतकी खेळी, भारताचे वेस्ट इंडिजसमोर 171 धावांचे लक्ष्य)

पोलार्ड भारताच्या डावाच्या 9 व्या षटकात गोलंदाजीला आला. या षटकात पोलार्डने 26 धावा दिल्या. फलंदाजी करत शिवमने या ओव्हरमध्ये सत्काराची हॅटट्रिक काढली. यानंतर दुबेची धावसंख्या 24 चेंडूत 48 होती. पोलार्डच्या ओव्हरदरम्यान, धावा घेताना पोलार्ड मध्यभागी आला ज्यामुळे दुबेला त्रास झाला. याच्यानंतर शिवमने एक चौकार आणि नंतर सलग तीन षटकार लागवत पोलार्डच्या घटनेचे प्रत्युत्तर आपल्याच अंदाजात दिले. सलग तीन षटकारानंतर पोलार्डची लय बिघडली आणि त्याने नंतर तीन वाईड बॉल टाकले. पोलार्डच्या ओव्हरमध्ये टीम इंडियाने 28 धावा काढल्या. पाहा शिवमच्या हॅटट्रिकचा हा मजेदार व्हिडिओ:

शिवम आयपीएलमध्ये कोहलीच्या नेतृत्वात असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत आहेत. दुबेने 16 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 48.19 च्या सरासरीने 1012 धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतकं आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. शिवमने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 39 षटकार ठोकले आहेत. शिवम ज्या प्रकारे षटकार मारतो त्यावरून युवराज सिंह याची झलक मिळू शकते. डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करताना शिवम उजव्या हाताने फलंदाजी करतो.