विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs WI 2nd ODI: भारतीय फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि एमएस धोनीच्या (MS Dhoni) विशिष्ट यादीत सामील होईल. आपल्या शानदार कारकिर्दीत भारतात 99 एकदिवसीय सामने खेळलेला कोहली एकदा तो वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मैदानात उतरताच देशात 100 वनडे खेळणारा भारतातील पाचवा आणि जगातील 36 वा क्रिकेटपटू बनेल. आतापर्यंत फक्त सचिन तेंडुलकर (164 सामने), एमएस धोनी (127 सामने), मोहम्मद अझरुद्दीन (113 सामने) आणि युवराज सिंह (108 सामने) यांनी भारतासाठी 100 किंवा त्याहून अधिक सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे. कोहली गेल्या वर्षी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कर्णधार म्हणून पायउतार झाला तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी त्याच्याकडून वनडे कर्णधारपद देखील काढून घेण्यात आले. (India's Likely Playing XI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडेत अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11, उपकर्णधार केएल राहुल IN तर कोण होणार आऊट)

दरम्यान विराट कोहलीने मायदेशात खेळलेल्या 99 वनडे सामन्यांबद्दल बोलायचे तर त्याने 5002 धावा केल्या आहेत. अहमदाबाद येथे वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात 4 चेंडूत 8 धावा करून कोहलीने घरच्या मैदानावर 5000 एकदिवसीय धावांचा टप्पा पूर्ण करण्यात केला. तर तो हा आकडा पार करणारा आतापर्यंतचा सर्वात वेगवान क्रिकेटपटू बनला आणि त्याने तेंडुलकरचा विक्रम मोडला ज्याने हा आकडा गाठण्यासाठी 112 डाव खेळले. विराटने अवघ्या 96 डावात ही कामगिरी केली. दुसरीकडे, विंडीजविरुद्ध मालिकेबद्दल बोलायचे तर भारताने रविवारी सहा विकेट्सने विजय मिळवून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत आता टीम इंडियाचे लक्ष दुसरा सामना जिंकून मालिका काबीज करण्याकडे असेल. तर अहमदाबाद येथे तिसरा सामना 11 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.

भारताचा नवनियुक्त एकदिवसीय कर्णधार रोहित शर्माने शानदार 51 चेंडूत 60 धावा केल्या. तर त्यापूर्वी युजवेंद्र चहलच्या 49 धावांत 4 विकेट घेऊन भारताने 2022 मध्ये त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय विजयावर शिक्कामोर्तब केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत क्लीन-स्वीपनंतर भारताने पहिल्या सामन्यात वर्चस्व गाजवत 43.5 षटकांत केवळ 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून एकहाती विजय मिळवला.