भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-20 (Photo Credit: PTI)

IND vs WI 1st T20I: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स (Eden Gardens) स्टेडियमवर खेळला गेला. तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरनच्या (Nicholas Pooran) स्फोटक अर्धशतकाच्या बळावर विंडीज संघाने प्रथम फलंदाजी करत 7 बाद 157 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली, तर भारताने 18.5 षटकांत 4 बाद 162 धावा करून सामना जिंकला. कर्णधार रोहित शर्मा, आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ईशान किशन (Ishan Kishan), सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर यांनी भारतासाठी उत्कृष्ट खेळी खेळली. या सामन्यात काही उल्लेखनीय रेकॉर्ड देखील बनले जे खालीलप्रमाणे आहेत. (IND vs WI 1st T20I: रोहित ब्रिगेडचा वेस्ट इंडिजवर 6 विकेटने शानदार विजय; मालिकेत घेतली 1-0 अशी आघाडी)

1. भारताचा सलामी फलंदाज किशनने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या सामन्यात संथ खेळी खेळून एक नकोस विक्रम आपल्या नावे केला आहे. किशनने 42 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने 32 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 83.33 होता. कोणत्याही भारतीय फलंदाजाने टी20 क्रिकेटमध्ये खेळलेली ही सर्वात संथ खेळी आहे. किशनपूर्वी दिनेश मोंगियाने 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 84.44 च्या स्ट्राइकरेटने 45 चेंडूत 38 धावांची सर्वात संथ खेळी खेळली होती.

2. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून स्टार फिरकी गोलंदाज रवी बिष्णोईने पदार्पण केले आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळाले आहे. त्याच्या 2/17 च्या आकडेवारीसह, बिष्णोई भारतीय गोलंदाजांच्या एलिट यादीत सामील झाला आहे ज्यांनी टी-20 फॉरमॅटमध्ये पदार्पणात 2 किंवा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

3. विंडीजविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला बिष्णोईने पहिल्या टी-20 सामन्यात 17 धावत दोन विकेट घेतल्या. भारतीय फिरकीपटूची टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पणातील ही तिसरी सर्वोत्तम आकडेवारी आहे. माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझाने 2009 मध्ये टी-20 पदार्पणात 4/21 अशी सर्वोत्तम आकडेवारी नोंदवली आहे.

4. निकोलस पूरनने सहावे T20 अर्धशतक ठोकले

5. भारताने 2018 पासून वेस्ट इंडीजविरुद्ध 10 सामन्यांमध्ये नवव्या T20 सामन्यात विजयाची नोंद केली आहे.

दरम्यान दोन्ही संघात आता दुसऱ्या टी-20 सामन्यावर सर्वांचे नजर असेल जो 18 फेब्रुवारी रोजी त्याच मैदानावर खेळले जाईल. यजमान टीम इंडिया आणखी एका विजयासह मालिका काबीज करण्यासाठी उत्सुक असेल तर तीन सामन्यांच्या या मालिकेत आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी विंडीज संघ विजयाच्या शोधात असेल.