IND vs WI 1st ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार विजयालाही परिपूर्ण मानत नाही रोहित शर्मा, सामन्यानंतर दिली अशी प्रतिक्रिया
रोहित शर्मा आणि ईशान किशन (Photo Credit: PTI)

IND vs WI 1st ODI: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघाने (Indian Team) वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. यजमान टीम इंडियाने पाहुण्या विंडीजचा 6 गडी राखून पराभव केला. नियमित कर्णधार म्हणून रोहितचा हा पहिलाच एकदिवसीय सामना होता. भारताने विंडीजला स्वस्तात गुंडाळले आणि सामना सहज जिंकला तरीही कर्णधार रोहित शर्माने दावा केला आहे की भारताच्या दृष्टिकोनातून हा सामना परिपूर्ण नव्हता. कर्णधार रोहित शर्मा पहिला एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर सामन्यानंतरच्या सादरीकरणात म्हणाला, “माझा परिपूर्ण खेळावर विश्वास नाही. तुम्ही परिपूर्ण होऊ शकत नाही. आम्हाला चांगले होत राहायचे आहे. एकंदरीत सर्वांचा उत्तम प्रयत्न. आम्ही सर्व क्षेत्रात चांगले केले. त्यामुळे खूप आनंद झाला. आम्हाला सामना लवकर संपवायचा होता, पण इतक्या विकेट्स गमवायचा नव्हत्या. त्यामुळे खालच्या ऑर्डरवरही दबाव येऊ शकतो.” (IND vs WI 1st ODI: विराट कोहलीने 8 धावांत बाद होऊनही इतिहास रचला, घरच्या मैदानावर वनडे क्रिकेटमधील आपल्या नावे केला आणखी नवा विक्रम)

तो पुढे म्हणाला, “मला कोणतेही श्रेय घ्यायचे नाही. आम्ही ज्याप्रकारे पहिली आणि शेवटची गोलंदाजी केली ती उत्कृष्ट होती. आम्हाला एक संघ म्हणून अधिक चांगले होत राहायचे आहे. संघाला जे हवे आहे ते आपण साध्य करू शकले पाहिजे हे अंतिम ध्येय आहे. संघाला आमच्यापेक्षा वेगळे काही करायचे असेल तर ते करावेच लागेल. आपण खूप बदलले पाहिजे असे समजू नका. मी खेळाडूंना एवढेच सांगतो की, स्वतःला आव्हान देत रहा.” सामन्याबद्दल बोलायचे तर युजवेंद्र चहलने वेस्ट इंडिजचा संघ 176 धावांत गुंडाळला. एका षटकात दोन गडी बाद केले आणि एकूण 49 धावांत 4 विकेट घेतल्या. अष्टपैलू जेसन होल्डरने आपले अर्धशतक झळकावले, परंतु 57 धावांवर तो बाद झाल्याने वेस्ट इंडिजला 200 धावांचा टप्पा गाठता आला नाही.

रोहित दुखापतीमुळे यापूर्वी दक्षिण आफ्रिका मालिकेला मुकला पण तो चांगल्या लयीत असल्याने मालिकेच्या सलामीच्या सामन्यापूर्वी आत्मविश्वासाने भरपूर दिसला. वव्हाईट-बॉल -कर्णधारने अहमदाबादमधील नेट सत्रालाही अधोरेखित केले ज्यामुळे संघाला तयारी करण्यात मदत झाली. “मी काही काळापासून बाहेर होतो, दोन महिने खेळलो नाही पण मी बॉल मारत परतलो आहे. पुढे एक मोठा हंगाम आहे हे माहित होते. येथे चांगले नेट सत्र झाले. या सामन्यात खेळण्याचा मला विश्वास होता,” रोहित म्हणाला. तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतल्यानंतर बुधवारी याच मैदानावर विंडीजविरुद्ध दुसऱ्या वनडेत भारताचा मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात असेल.