IND vs SL T20I 2021: मुंबई इंडियन्सच्या ‘या’ दोन खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी रेस, टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आहे महत्वाची जागा
सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन (Photo Credit: PTI)

IND vs SL T20I 2021: शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघाने (Indian Team ) श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) वनडे मालिकेत 2-1 असा विजय मिळवल्यावर आता दोन्ही संघात आजपासून टी-20 क्रिकेटचा थरार रंगणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंनेर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघासाठी महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे या मालिकेत खेळाडूंच्या विशेषतः युवा क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागून असणार आहेत. पण त्यापूर्वी भारतीय संघापुढे एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे आणि तो म्हणजे टीममध्ये तिसऱ्या स्थानावर फलंदाजी कोण करणार? नियमित कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) यापूर्वी स्वतः टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत सलामीला येण्याबाबत सकारात्मकता दाखवली होती. अशास्थितीत आता विराटच्या तिसऱ्या क्रमांकासाठी आयपीएलच्या मुंबई इंडियन्सचे ईशान किशन (Ishan Kishan) व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) शर्यतीत आहेत. (Indian Cricket Team: ईशान किशन-पृथ्वी शॉ बनले केएल राहुल आणि शिखर धवन यांच्यासाठी मोठी अडचण, जाणून घ्या ते कसे)

एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात ईशान किशनला नंबर-3 वर संधी देण्यात आली. होती इशानने पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. मात्र तो तिसरा सामना खेळला नाही. तसेच सूर्यकुमार यादव देखील एक उपयुक्त पर्याय आहे. ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर उतरेल की सूर्यकुमार यादव, याबाबत निर्णय घेण्यात व्यवस्थापनापुढे मोठा संभ्रम निर्माण होऊ शकतो. मात्र, एकदिवसीय मालिकेत किशनने ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्याला सूर्यकुमारच्या पुढे संधी दिली जाऊ शकते असे दिसत आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत तिसरे स्थान महत्वाचे आहे. टीम इंडिया कर्णधार विराट या क्रमांकावर फलंदाजी करतो. पण त्याने रोहित शर्मासमवेत विश्वचषकात सलामीला उतरू शकतो याबाबत माहिती दिली होतो. अशा परिस्थितीत ईशान आणि सूर्यकुमार हे नंबर-3 साठी प्रबळ दावेदार आहेत. सूर्यकुमारने मुंबई इंडियन्स आणि इंग्लंड विरुद्ध टी-20 मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर चांगली कामगिरी बजावली होती.

दुसरीकडे, श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा मुख्य खेळाडू व अष्टपैलू हार्दिक पांड्या वनडे मालिकेत कमाल करू शकला नाही. त्यामुळे आगामी तो आपल्या कामगिरीत सुधार करू पाहत असेल. टी-20 विश्वचषक स्पर्धेत तो मधल्या फळीत संघाचा एक मुख्य खेळाडू असू शकतो. तथापि, तो दुखापतीतून पुनरागमन करीत असल्यामुळे तो अद्याप लयीत परतलेला नाही आहे. तसेच कर्णधार शिखर धवनसाठी देखील ही मालिका संघात स्थान मिळवण्याची अखेरची संधी ठरू शकते. इंग्लंडविरुद्ध अखेरच्या टी-20 मालिकेच्या 5 सामन्यांपैकी धवनला केवळ एका सामन्यात संधी देण्यात आली. केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली हे सलामीसाठी प्रबळ दावेदार आहेत. अशा परिस्थितीत धवनला आक्रमक कामगिरी दाखवावी लागेल.