IND vs SL: रोहित शर्मा म्हणाला भारतीय क्रिकेटच्या भविष्यात ‘या’ खेळाडूंची भूमिका महत्त्वाची, संजू सॅमसन T20 विश्वचषकच्या शर्यतीत
रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने लखनऊ येथे श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) पहिल्या टी-20 सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना सांगितले की, श्रीलंकेविरुद्ध आगामी टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) उपकर्णधारपद मिळाल्याने मला आनंद होत आहे. तसेच दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या केएल राहुलच्या (KL Rahul) अनुपस्थितीत श्रीलंकेविरुद्ध घरच्या मालिकेत बुमराहला उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राहुल वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा उपकर्णधार होता पण दुसऱ्या सामन्यात दुखापतीमुळे तो बाहेर पडल्यावर ऋषभ पंत अंतिम सामन्यात व टी-20 मालिकेत उपकर्णधार बनला होता. (India's Likely Playing XI for 1st T20I: श्रीलंकाई आव्हानासाठी टीम इंडिया सज्ज; जडेजा-बुमराह यांचे आगमन अटळ, पहिल्या सामन्यात कोणते 11 खेळाडू खेळणार?)

दरम्यान, श्रीलंकेविरुद्ध मालिकेच्या पूर्वसंध्येला भारताचा पूर्णवेळ कर्णधार रोहितने विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनची (Sanju Samson) प्रशंसा केली की तो सर्वात प्रतिभावान फलंदाजांपैकी एक असल्याचे म्हटले. रोहितने पुढे म्हटले की सॅमसन त्याच्या शानदार बॅकफूट खेळामुळे या वर्षअखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी शर्यतीत आहे. 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून, सॅमसनने 10 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे ज्यात त्याने 11.70 च्या सरासरीने 117 धावा केल्या आहेत. “"संजू सॅमसनकडे प्रतिभा आहे - जेव्हाही आम्ही त्याला फलंदाजी करताना पाहिले आहे तेव्हा त्याने एक डाव खेळला आहे जिथे लोक चढतात. त्याच्याकडे यशस्वी होण्याचे कौशल्य आहे - त्याचा बॅकफूट वरील खेळ शानदार आहे - तो निश्चितपणे शर्यतीत आहे,” शर्मा पुढे म्हणाला.

दरम्यान निवड समिती राहुल, पंत आणि बुमराह यांना नेतृत्वाच्या भूमिकेत तयार करण्याच्या विचारात आहे. रोहितने असेही अधोरेखित केले की बुमराह, राहुल आणि पंत या त्रिकुटाचा संघातील नेतृत्वाच्या भूमिकेसाठी विचार केला जाईल. उल्लेखनीय म्हणजे, विराट कोहलीच्या कार्यकाळानंतर भारत कर्णधार उमेदवाराच्या शोधात आहे. “तुम्ही जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्याबद्दल बोललो तर भारतीय क्रिकेटच्या भविष्यात या खेळाडूंची भूमिका महत्त्वाची आहे. ते नेतृत्वासाठी संभाव्य दावेदार म्हणूनही आहेत,” तो पुढे म्हणाला. वेस्ट इंडिज मालिकेसाठी विश्रांती मिळालेला बुमराह श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि कसोटी सामन्यांमध्ये भारतीय वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करेल.