India's Likely Playing XI for 1st T20I: श्रीलंकाई आव्हानासाठी टीम इंडिया सज्ज; जडेजा-बुमराह यांचे आगमन अटळ, पहिल्या सामन्यात कोणते 11 खेळाडू खेळणार?
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

IND Likely Playing XI for 1st T20I: नंबर एक टी-20 संघ, टीम इंडिया (Team India) आणि 9 व्या स्थानावरील श्रीलंका (Sri Lanka) संघ एकमेकांशी भिडणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया लंकन वाघा विरोधात विजयाचे प्रबळ दावेदार आहेत. टीम इंडिया त्यांच्या दोन सर्वोत्तम टी-20 फलंदाज - विराट कोहली, केएल राहुल व ऋषभ पंत (Rishabh Pant), या पहिल्या पसंतीच्या खेळाडूंशिवाय मैदानात उतरेल. राहुल अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही तर कोहली आणि पंत यांना आराम देण्यात आला आहे. तसेच दीपक चाहर (Deepak Chahar) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) देखील दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत. पण धाकड अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि तडाखेबाज गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांच्या परतल्याने संघाला काहीसा दिलासा मिळाला आहे. अशा परिस्थितीत श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघात कोणत्या 11 खेळाडूंना स्थान मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. (IND vs SL: टीम इंडियासाठी मोठी बातमी, श्रीलंकेचा सर्वात मोठ्या धोकादायक खेळाडूची T20 मालिकेतून एक्झिट)

भारताचे सलामीवीर:

रोहितसेने पुन्हा एकदा नवीन सलामी जोडीला मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध मधल्या फळीत फलंदाजीला उतरला होता आणि फ्लॉप ठरला. त्यामुळे यावेळी तो अशी चूक पुन्हा करू इच्छित असेल. पण मधल्या फळीत पंत आणि सूर्यकुमारच्या अनुपस्थितीत रोहित श्रीलंकेविरुद्ध युवा ओपनर ऋतुराज गायकवाड सोबत यंदा सलामीला उतरू शकतो. ऋतुराज विंडीजविरुद्ध तिसऱ्या सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरला, पण यावेळी पर्याय उपलब्ध नसल्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल.

मधली फळी:

श्रेयस अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळाल्याने संघ व्यवस्थापन त्याला विराट कोहलीचा बॅकअप मानत असल्याचे संकेत दिले. त्यामुळे माजी कर्णधाराच्या अनुपस्थितीत मुंबईकर फलंदाजाने पहिल्या सामन्यात आपला फलंदाजीक्रम कायम ठेवावा. तसेच सूर्यकुमार यादव आभार पडल्यामुळे त्याची जागा घेण्यासाठी ईशान किशन उपयुक्त पर्याय असेल. किशन सलामीला आणि मधल्या फळीत फलंदाजीचा पर्याय संघाला देतो, तर गायकवाड ओपनिंग फलंदाज आहे. तर संजू सॅमसन पाचव्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी संघाची घोषणा करताना सांगितले की, ते सॅमसनकडे पंतचा बॅकअप कीपर म्हणून पाहत आहेत. त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारने या मालिकेत पंतच्या जागेवर फलंदाजी करावी.

अष्टपैलू:

व्यंकटेश अय्यरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन T20 सामन्यांमध्ये 184 च्या शानदार स्ट्राइक रेटने 92 धावा केल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध, कोलकाता नाइट रायडर्सचा सलामीवीर व्यंकटेश यादवच्या साथीने भारतासाठी फिनिशर म्हणून उदयास आला. आणि भारताच्या तळाच्या फळीला आणखी मजबूत करण्यासाठी दुखापतीतून जडेजाच्या पुनरागमन करेल. आघाडीच्या फिरकीपटूंपैकी एक म्हणून योगदान देऊन संघाला अधिक चांगला समतोल प्रदान करून तो सातव्या क्रमांकावर ताबडतोब फलंदाजी करण्यास पटाईत आहे.

गोलंदाज:

श्रीलंकेविरुद्ध भारताच्या गोलंदाजी क्रमात मागील सामन्यातून फक्त तीन बदल होऊ शकतात. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल संघात परततील. बुमराहला विंडीजविरुद्ध मालिकेसाठी विश्रांती दिली होती, तर भुवी आणि चहलला तिसऱ्या सामन्यातून बाहेर बसवले होते. याशिवाय हर्षल पटेलचे 11 खेळाडूंमधील स्थान अबाधित राहील. हर्षल पटेल हा मध्यम आणि डेथ-ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून उदयास आला. बुमराहच्या बरोबरीने त्याचे स्लोअर आणि यॉर्कर्स बॉलचे एक घातक संयोजन तयार करू शकतो.

India 1st T20I Likely Playing XI: रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन, व्यंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल.