IND vs SL ODI 2021: श्रीलंकाविरुद्ध वनडे मालिकेसाठी ‘या’ माजी भारतीय दिग्गज खेळाडूने निवडला प्लेइंग XI, 2 खेळाडूंनी दिली पदार्पणाची संधी

श्रीलंका दौऱ्यावर 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेसाठी काउंटडाउन सुरु झाले आहे. चाहते भारताच्या नव्या प्लेइंग इलेव्हनच्या प्रतीक्षेत असताना, भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने वनडे मालिकेसाठी प्लेइंग इलेव्हन निवडले आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना लक्ष्मणने एकदिवसीय सामन्यांसाठी सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन या दोन नवख्या खेळाडूंचा समावेश केला आहे.

Close
Search

क्रिकेट Priyanka Vartak|
IND vs SL ODI 2021: श्रीलंकाविरुद्ध वनडे मालिकेसाठी ‘या’ माजी भारतीय दिग्गज खेळाडूने निवडला प्लेइंग XI, 2 खेळाडूंनी दिली पदार्पणाची संधी
रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

IND vs SL ODI 2021: श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka) 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेसाठी काउंटडाउन सुरु झाले आहे. टीम इंडियाचे (Team India) नियमित खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे चेतन शर्माच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या मालिकेसाठी अनुभवी सलामी फलंदाज शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वात ‘द्वितीय श्रेणी’ संघाची निवड केली आहे. नवीन खेळाडूंसोबत राहुल द्रविड नवीन मुख्य प्रशिक्षकही आहेत. द्रविडने पहिल्यांदा वरिष्ठ संघासह प्रमुख भूमिका स्वीकारली आहे. असंख्य नवीन चेहरे असल्याने त्यातील काही जण पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतील. चाहते भारताच्या नव्या प्लेइंग इलेव्हनच्या प्रतीक्षेत असताना, भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने (VVS Laxman) वनडे मालिकेसाठी प्लेइंग इलेव्हन निवडले आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना लक्ष्मणने एकदिवसीय सामन्यांसाठी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) या दोन नवख्या खेळाडूंचा समावेश केला आहे. (IND vs SL Series 2021: श्रीलंका दौऱ्यावर ‘या’ 3 भारतीय खेळाडूंना कदाचित मिळेल आंतरराष्ट्रीय डेब्यूची संधी, करावी लागू शकते आणखी प्रतीक्षा)

सूर्यकुमार आणि संजूने यांनी भारताकडून टी-20 सामने खेळले आहेत मात्र वनडे संघात त्यांना अद्याप संधी मिळालेली नाही. सॅमसनला यापूर्वी 2014 मध्ये भारतीय संघात स्थान मिळाले होते मात्र त्याला सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. लक्ष्मणने सलामीसाठी शिखर धवन-पृथ्वी शॉची निवड केली तर यादवला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले. सॅमसनने ईशान किशनला मागे टाकत विकेटकीपर म्हणून लक्ष्मणच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले. लक्ष्मणच्या मधल्या फळीत हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या आणि मनीष पांडे यांचा समावेश आहे. हार्दिक अष्टपैलू म्हणून खेळण्याची अपेक्षा आहे. तसेच भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहर हे दोन वेगवान गोलंदाज आहेत तर कुलदीप यादव व युजवेंद्र चहल फिरकीपटू आहेत. चहल आणि कुलदीप 2020/21 च्या हंगामात इलेव्हन खेळायला नियमित नव्हते.

भारत-श्रीलंका मालिकेतील तीन एकदिवसीय सामने 13, 16 आणि 18 जुलै रोजी खेळले जातील तर टी-20 सामने 21, 23 आणि 25 जुलै रोजी आयोजित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे सर्व सामने कोलंबोच्या आर प्रेमादासा स्टेडियमवर खेळले जातील.

व्हीव्हीएस लक्ष्मणची प्लेइंग इलेव्हन: शिखर धवन (कॅप्टन), पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, मनीष पांडे, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
क्रिकेट

SRH vs MI IPL 2024: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना ठरला आयपीएलचा ऐतिहासिक सामना, मोडले गेले 'हे' पाच महत्त्वाचे विक्रम

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change