IND vs SL 3rd T20I: जसप्रीत बुमराह याने अश्विन आणि युजवेंद्र चहल यांना मागे टाकत बनला टीम इंडियासाठी सर्वाधिक टी-20 विकेट्स घेणारा गोलंदाज
जसप्रीत बुमराह (Photo Credit: Getty)

तीन सामन्यांच्या टी -20 मालिकेच्या अखेरच्या सामन्यात भारताने (India) श्रीलंकेला (Sri Lanka) 202 धावांचे लक्ष्य दिले. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर शुक्रवारी खेळल्या जाणार्‍या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 बाद 201 धावा केल्या. भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला यॉर्कर किंग जसप्री बुमराह (Jasprit Bumrah) याने पहिला धक्का दिला आणि टी -20 मध्ये भारतासाठी 53 विकेट घेणारा बुमराह पहिला गोलंदाज ठरला. त्याने या प्रकरणात युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांना मागे टाकले. चहलने 52 विकेट घेण्यासाठी 36 आणि अश्विनने 46 सामने खेळले. बुमराह तब्बल 4 महिन्यानंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन केले. काही काळापासून बुमराह दुखापतीने झगडत होता. श्रीलंकेच्या डावाच्या पहिल्या षटकात बुमराहने दानुष्का गुणथिलाकाला बाद करत हा पराक्रम केला. (IND vs SL 3rd T20I: संजू सॅमसन याने श्रीलंकाविरुद्ध टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवत नोंदवला अनोखा रेकॉर्ड)

बुमराह बर्याच दिवसांच्या दुखापतीतून परतला आहे. इंदोर येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या टी-20 सामन्यात बुमराहने दुखापतीतून पुनरागमन करताना पहिला सामना खेळला. या सामन्यात त्याने चार षटकांत 32 धावा देऊन एक गडी बाद केला. या सामन्यापूर्वी बुमराह चहल आणि अश्विन 52 विकेटसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. दरम्यान, चहलला अद्याप बुमराहची बरोबरी किंवा त्याच्या पुढे जाण्याची संधी आहे. सध्या सुरू असलेल्या सामन्याच्या शेवटी कोण अव्वल शान गाठेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. टी-20 मध्ये 53 विकेट्ससह बुमराहने मुस्तफिजुर रहमान, ड्वेन ब्राव्हो, सुनील नरेन आणि ग्रॅमी स्वान यांनाही मागे सोडले आहे. आंतराष्ट्रीय टी-20 क्रिकेट सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याच्या नावावर आहे. गेल्या वर्षी स्ट्रेस फ्रॅक्चरमध्ये बुमराहला दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागले होते. मात्र, तो आता परतला आहे आणि ऑस्ट्रेलियामधील टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अवघ्या 9 महिने राहिले असताना टीम इंडियासाठी ही आनंदाची बातमी आहे.

दुसरीकडे, पुण्यात सुरु असलेल्या सामन्याबद्दल बोलले तर, टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियासाठी केएल राहुल आणि शिखर धवन यांनी चांगली सुरुवात केली. दोंघांमध्ये सलग दुसऱ्यांदा अर्धशतकी भागीदारी झाली. राहुल 54 आणि धवन 52 धावांवर बाद झाला.