IND vs SL 3rd T20I: लसिथ मलिंगा याचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; संजू सॅमसन आणि मनीष पांडे In, रिषभ पंत Out
रिषभ पंत, संजू सॅमसन (Photo Credit: Getty Images)

भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेचा शेवटचा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमनंतर लवकरच सुरू होईल. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेत 1-0 ने आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला नवीन वर्ष 2020 ची पहिली टी-20 मालिका जिंकण्याची संधी आहे. दुसरीकडे, सामना जिंकून मालिका बरोबरीत करण्याच्या उद्देशाने श्रीलंका संघ मैदानावर उतरणार आहे. टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हन तीन बदल झाले आहे. संजू सॅमसन (Sanju Samson), मनीष पांडे (Manish Pande) आणि युजवेंद्र चहल यांना स्थान देण्यात आले आहे. कुलदीप यादव, रिषभ पंत (Rishabh Pant) आणि शिवम दुबे यांना विश्रांती देण्यात आली आहे. सॅमसनला 2015 नंतर पहिल्यांदा संघात खेळण्याची संधी दिली गेली आहे. इंदोरमधील दुसऱ्या सामन्यात राहुल आणि धवनने पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली होती. दुसरीकडे, श्रीलंकेच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहे. एंजेलो मॅथ्यूज आणि लक्षन संदकन यांनी पुनरागमन केले आहे. (IND vs SA 3rd T20I: पुणे टी-20 सामना जिंकून टीम इंडियाचा पाकिस्तानच्या 'या' रेकॉर्डची बरोबरी करण्याचा प्रयत्न)

आजवर श्रीलंकाविरुद्ध खेळलेल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने 12 तर श्रीलंकेने 5 वेळा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने जर आजचा सामना जिंकला तर तो त्यांचा श्रीलंकाविरुद्ध 13 वा विजय असेल, जो भारताच्या कोणत्याही संघाविरुद्ध सर्वाधिक असेल. शिवाय, आजवर श्रीलंकाने भारताविरुद्ध एकाही द्विपक्षीय टी-20 मालिका जिंकलेली नाही.

असा आहे भारत-श्रीलंकेचा प्लेयिंग इलेव्हन

भारत: विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), मनीष पांडे, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.

श्रीलंका: लसिथ मलिंगा (कॅप्टन), अविष्का फर्नांडो, दनुष्का गुणथिलाका, कुसल परेरा, ओशादा फर्नांडो, एंजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका, लक्षन संदकन, वनिंदू हसरंगा आणि लाहिरू कुमारा.