IND vs SA 3rd T20I: पुणे टी-20 सामना जिंकून टीम इंडियाचा पाकिस्तानच्या 'या' रेकॉर्डची बरोबरी करण्याचा प्रयत्न
विराट कोहली, लसिथ मलिंगा (Photo Credit: Getty)

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर मंगळवारी खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांच्या मालिकेच्या दुसर्‍या टी-20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने (Indian Team) श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध 7 विकेटने विजय मिळवला. आता दोन्ही संघ पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर तिसरा आणि अंतिम सामना खेळला जाईल. गुवाहाटीमधील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे, पुणेमधील होणार सामना निर्णायक असेल. टीम इंडियासध्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे आणि तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत श्रीलंकेचा क्लीन-स्वीप मिळवू पाहिलं. भारतीय संघाने हा सामना जिंकत टीम इंडिया पाकिस्तानच्या कोणत्याही एका संघाविरूद्ध सर्वाधिकआंतरराष्ट्रीय टी-20 सामने जिंकण्याची बरोबरी करेल. पाकिस्तानने (Pakistan) न्यूझीलंड आणि श्रीलंकेला प्रत्येकी 13-13 वेळा टी-20 सामन्यात पराभूत केले आहे. कोणत्याही संघाने दुसऱ्या संघाला सर्वाधिक वेळा पराभूत करण्याची सर्वाधिक वेळ आहे.

सध्या टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध 12 टी -20 सामने जिंकले आहेत. या यादीमध्ये पाकिस्ताननंतर अफगाणिस्तान, इंग्लंड आणि भारताचा क्रमांक लागतो ज्याने आजवर कोणत्याही एका संघाविरुध्द सर्वाधिक 12-12 सामने जिंकले आहेत. अफगाणिस्तानने आयर्लंड, इंग्लंड, न्यूझीलंड आणि भारताने श्रीलंकेविरूद्ध हा पराक्रम केला आहे.

दुसरीकडे, श्रीलंकाच्या नावावर एक नकोस रेकॉर्ड जोडला गेला आहे. श्रीलंकेच्या संघाने आतापर्यंत 62 टी -20 सामने गमावले आहेत, जे कोणत्याही संघातील सर्वोच्च आहेत. इंदूर टी -20 मध्ये भारताने श्रीलंकेला पराभूत केले आणि श्रीलंकेला 62 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. या यादीमध्ये वेस्ट इंडीज 61 पराभवांसह दुसऱ्या आणि बांग्लादेश 60 पराभवांसह तिसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडिया श्रीलंकाविरुद्ध मालिका विजयाचा प्रबळ दावेदार आहे आणि त्याचा विजय जवळजवळ निश्चित झाला आहे, परंतु क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकते. भारत आणि श्रीलंका यांच्यातील अखेरचा टी-20 सामना पुण्यात खेळला गेला, ज्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या सामन्यात टीम इंडिया 101 धावांवर ऑल-आऊट झाली होती. दरम्यान, श्रीलंकेकडून मालिका संपल्यानंतर टीम इंडिया 14 जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.