केएल राहुल-शिखर धवन (Photo Credit: Getty)

श्रीलंकाविरुद्ध टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा टी-20 सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेचा (Sri Lanka) संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशामध्ये पहिले फलंदाजी करत भारताने (India) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 बाद 201 धावा केल्या आणि श्रीलंकेला विजयासाठी 202 धावांचे विशाल लक्ष्य दिले. भारताने चांगली सुरुवात केली, मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी खेळात पुनरागमन करत भारतीय फलंदाजांना परेशान केले. भारताकडून केएल राहुल (KL Rahul) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी तिसर्‍या टी-20 सामन्यात भारताला वेगवान सुरुवात करून दिली. धवनने टी -20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचे 34 वे चेंडूत 10 वे अर्धशतक पूर्ण केले. धवन आणि राहुल यांच्यात पहिल्या विकेटसाठी 97 धावांच्या भागीदारीमुळे संघाला चांगली सुरुवात मिळाली. टीम इंडियाकडून राहुलने सर्वाधिक 54 तर धवनने 52 धावा केल्या. लक्षन संदकन (Lakshman Sandakan) याने श्रीलंकेकडून सर्वाधिक 3 गडी बाद केले. (IND vs SL 3rd T20I: विराट कोहली याचा झाला एमएस धोनी याच्या स्पेशल क्लबमध्ये समावेश, 'ही' कामगिरी करणारा बनला जलद कर्णधार)

धवनने 34 चेंडूत 10वे टी-20 अर्धशतक पूर्ण केले. मात्र अर्धशतक झळकावल्यानंतर तो मोठी धावसंख्या उभारू शकला नाही आणि 52 धावा करून तो पॅव्हिलियनमध्ये परतला. यानंतर संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर क्रीजवर आला आणि पहिल्याच चेंडूवर षटकारासह खाते उघडले. मात्र, त्याने दुसऱ्याच चेंडूवर वनिंदूं हसरंगालाआपली विकेट दिली. राहुलने 34 चेंडूत अर्धशतक ठोकले पण तो त्वरित बाद झाला. राहुलने 54 धावा केल्या. यानंतर श्रेयस अय्यरही 4 धावा करुन संदकनचा बळी ठरला. दनुष्का गुणथिलाका याने कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला 25 धावांवर रनआऊट केले. लाहिरू कुमाराने वॉशिंग्टन सुंदरला शून्यावर संदकनकडे कॅच आऊट केले. अखेरीस मनीष पांडे आणि शार्दूल ठाकूर अनुक्रमे 31 आणि 22धावांवर नाबाद परतले. यासामन्यात 1 धाव करताच विराटने कर्णधार म्हणून 11,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केली. कोहली ही कामगिरी करणारा सर्वात जलद कर्णधार बनला.

या सामन्यात कोहलीने तीन बदल केले. रिषभ पंतच्या जागी विकेटकीपर-फलंदाजी सॅमसन, कुलदीप यादवच्या जागी युजवेंद्र चहल आणि शिवम दुबे याच्या जागी मनीष पांडे याला संधी दिली. दुसरीकडे, श्रीलंकेच्या संघात आज दोन बदल पाहिले गेले.