
आता भारतीय (India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्याबद्दल असे बोलले जात आहे की साम्ण्यासाठी जेव्हा तो मैदानात उतरतो तेव्हा काही विक्रमाची नोंद केल्यावरच बाहेर पडतो. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंदोर टी-20 मध्ये भारताने सात गडी राखून विजय मिळविला आणि त्या सामन्यात कोहलीने दोन जागतिक विक्रमही नोंदवले होते. आणि आता पुण्यातील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 1 धाव करताच विराटचा भारताचा माजी कर्णधार आणि महान विकेटकीपर महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या विशेष क्लबमध्ये समावेश झाला. श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध पुणेमध्ये सुरु असलेल्या सामन्यात कर्णधार म्हणून कोहलीने 11 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. असे करणारा तो जगातील सहावा, तर फक्त दुसरा भारतीय कर्णधार बनला आहे. विराटपूर्वी फक्त धोनीनेच कामगिरी बजावली होती. इंदौर टी -20 मध्ये कर्णधार विराट 17 चेंडूत 30 धावांवर नाबाद राहिला. शिवाय, वेगवान 11,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा कोहली पहिला कर्णधार ठरला. या खेळीदरम्यान, कोहलीच्या नावावर आता कर्णधार म्हणून टी-20 क्रिकेटमध्ये 1006 धावांची नोंद झाली जो कि एक विश्वविक्रम आहे.
इतकेच नाही तर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता विराटच्या नावावर आहे. या स्वरूपात, यापूर्वी त्याच्या नावावर 2663 धावांची नोंद झाली. या प्रकरणात त्याने टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा याला दुसर्या क्रमांकावर ढकलले आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून कोहलीने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये धावा केल्या आहेत.कोहलीने 83 एकदिवसीय सामन्यांमध्ये 77.60 च्या सरासरीने 4889 धावा केल्या आहेत तर 53 कसोटी सामन्यात 63.80 च्या सरासरीने त्याने 5104 धावा केल्या आहेत. टी-20 कर्णधार म्हणून कोहलीचा हा 33 वा सामना आहे.
टीम इंडिया सध्या पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना खेळत आहे. यामध्ये टॉस जिंकून श्रीलंकाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये 2 तर भारताच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये 3 बदल करण्यात आले. रिषभ पंत याला विश्रांती देण्यात आली असून संजू सॅमसन याला स्थान देण्यात आली आहे. याशिवाय मनीष पांडे आणि युजवेंद्र चहल यांनाही संधी मिळाली आहे.