IND vs SL 3rd T20I 2021: बर्थडे बॉय Wanindu Hasaranga याच्या फिरकीची जादू, भारतीय फलंदाजांची हाराकिरी; श्रीलंकेला विजयासाठी अवघ्या 82 धावांचे टार्गेट
भारत विरुद्ध श्रीलंका (Photo Credit: PTI)

IND vs SL 3rd T20I 2021: टीम इंडिया (Team India) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील शेवटचा तिसरा आणि निर्णायक टी 20 सामना आज श्रीलंकेच्या प्रेमदासा मैदानात सुरु आहे. तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सद्य दोन्ही संघातील सामना 1-1 अशा बरोबरीत असून आजचा सामना निर्णायक सामन्यात धवन ब्रिगेडने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 81 धावा करत लंकन फिरकीपटूंपुढे हाराकिरी पत्करली. टीम इंडियासाठी भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 16 धावा केल्या तर शिखर धवनला 14 धावाच करता आल्या. याशिवाय अन्य फलंदाज दहाचा आकडा देखील गाठू शकले नाही. दुसरीकडे, यजमान श्रीलंकेसाठी बर्थडे बॉय वनिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) 4 विकेट्स काढल्या. तसेच त्यापाठोपाठ कर्णधार दासुन शनकाने दोन, दुश्मंत चमीरा व रमेश मेंडिस यांनी प्रत्येकी एक विकेट काढली. (IND vs SL 3rd T20I 2021: निर्णायक लढतीत भारताचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय; धवन ब्रिगेडच्या प्लेइंग XI मध्ये झाला एक बदल)

तीन टी-20 सामन्यांच्या आजच्या तिसऱ्या व अंतिम सामन्यात भारताने टॉस जिंकला आणि यजमान संघाला गोलंदाजी करण्यास सांगितले. मात्र, कर्णधार धवनचा हा निर्णय चुकीचा ठरला व संघ आव्हानात्मक धावसंख्या देखील उभी करू शकला नाही. कोविड-19 पॉझिटिव्ह कृणाल पांड्या आणि त्याच्या संपर्कात आलेल्या तब्बल 8 मुख्य खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाकडून युवा खेळाडू मैदानात उतरले. देवदत्त पडिक्क्ल, रुतुराज गायकवाड, नितीश राणा व चेतन सकारिया यांनी दुसऱ्या सामन्यातुन टी-20 पदार्पण केले. पण, सर्व नवोदित खेलदु बॅटने प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. शिवाय, कर्णधार धवनने देखील निराश केले.  धवन पहिल्याच ओव्हरमध्ये चमिराच्या बोलवर तो झेलबाद झाला. टीम इंडियाचा कर्णधार सलामीवीर रुतुराजसोबत मोठी धावसंख्या उभारेल अशी आशा होती, पण अनुभवी सलामी फलंदाजाने सर्वांच्या आशेवर अखेर पाणी फेरलं.

दुसरीकडे, यापूर्वी भारतीय संघाने 2-1 अशी वनडे मालिका देखील काबिज केली होती. त्यामुळे टी-20 मालिकाही खिशात घालण्याचा त्यांचा निर्धार असेल. पण आजच्या सामन्यात फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर आता गोलंदाजांवर संघाला विजय मिळवून देण्याची मदार असेल.