IND vs SL Pink-Ball Test: रोहित शर्मा-विराट कोहली यांच्यात फलंदाजीत वर्चस्वाची लढाई, D/N कसोटी सामन्यात कोण ठरणार कोणावर भारी?
विराट कोहली, रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs SL Pink-Ball Test: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात 12 ते 16 मार्च दरम्यान बेंगलोरच्या (Bangalore) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. भारतीय संघाने (Indian Team) मोहाली येथे झालेल्या पहिल्या सामन्यात वर्चस्वपूर्ण कामगिरी करून एकहाती विजय मिळवला आणि दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0  अशी आघाडी घेतली. आता दोन्ही संघातील दुसरा सामना दिवस/रात्र म्हणजेच गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात अंतर्गत लढाई होणार आहे. भारताने आतापर्यंत 3 दिवस-रात्र कसोटी खेळले आहेत. यापैकी 2 मायदेशात जिंकले आहेत आणि ऑस्ट्रेलियात खेळलेल्या एका सामन्यात पहिल्या डावात 36 धावांवर बाद झाल्यानंतर अॅडलेड कसोटी गमावली आहे. (IND vs SL, Pink-Ball Test: कुलदीप यादव याची एकही सामना न खेळता एक्झिट; Axar Patel याचा समावेश, या खेळाडूच्या बदली मिळू शकते प्लेइंग XI मध्ये एन्ट्री)

पिंक-बॉल कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट कोहली  सध्या अव्वल स्थानावर आहे. माजी कर्णधाराने गुलाबी चेंडूच्या कसोटीत 4 डावात 60.25 च्या सरासरीने 241 धावा केल्या आहेत. तसेच कोहली गुलाबी चेंडूने कसोटीत शतक करणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे. कोहलीने कोलकाता येथे पहिल्या वाहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताच्या डावात बांगलादेशविरुद्ध 136 धावा चोपल्या होत्या. उल्लेखनीय म्हणजे, विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावण्याची ही शेवटची वेळ होती. दरम्यान, एलिट लिस्टमध्ये रोहित शर्मा 2 कसोटीत 112 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या भारताच्या शेवटच्या डे/नाईट सामन्यात रोहितने महत्त्वपूर्ण 66 धावांची खेळी केली होती. त्यामुळे रोहितला या यादीत कोहलीला मागे टाकण्याची संधी आहे, जर कर्णधाराने गुलाबी-बॉल कसोटीत मोठा डाव खेळला आणि पहिल्या कसोटीत बॅटने आपल्या सामान्य प्रदर्शनाची भरपाई केली.

दुसरीकडे, बेंगलोर कसोटीत विराट कोहली, जो मोहालीमध्ये 8000 कसोटी धावा पूर्ण करणारा केवळ 6वा भारतीय फलंदाज बनला आहे, त्याला ऑस्ट्रेलियाच्या महान मार्क वॉ यांना मागे टाकण्याची संधी आहे ज्याने 8029 धावा पूर्ण केल्या आहेत. भारतीय फलंदाजाने आणखी 23 धावा करताच तो ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूच्या पुढे जाईल. इतकंच नाही तर कोहली एलिट लिस्टमध्ये दिग्गज गॅरी सोबर्स यांच्या 25 धावांनी मागे आहे.