IND vs SL 2nd T20I: श्रीलंकाविरुद्ध सामन्यापूर्वी Rahul Dravid यांचे टीम इलेव्हनवर मोठे भाष्य, म्हणाले- ‘प्लेइंग इलेव्हनचं’ (Watch Video)
राहुल द्रविड (Photo Credit: Getty)

IND vs SL 2nd T20I: श्रीलंका दौर्‍यावर (Sri Lanka Tour) असलेले भारतीय संघाचे (Indian Team) मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडिया (Team India) प्लेइंग इलेव्हनबाबत मोठे भाष्य केले. द्रविडने म्हटले की पहिल्या पसंतीच्या खेळाडूंचा विचार न करणे हे भाग्यवान असले तरी त्यांची जागा घेणारे खेळाडूही तितकेच सक्षम आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय संघाकडून खेळण्याचा अधिकार मिळवला आहे. मंगळवारी सकाळी भारतीय संघाला कोविड-19 संक्रमणाचा फटका बसला जेव्हा टीमचा अष्टपैलू कृणाल पांड्या (Krunal Pandya) याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला. परिणामी, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, क्रुणाल पंड्या, दीपक चाहर, मनीष पांडे आणि युजवेंद्र चहल यांना दुसऱ्या टी-20 सामन्यातून बाहेर बसावे लागले. (IND vs SL 2nd T20I 2021: श्रीलंकेने टॉस जिंकला, आधी गोलंदाजीचा निर्णय; भारताकडून ‘या’ पुणेकरासह 4 खेळाडूंचे टी-20 पदार्पण)

दुसर्‍या टी-20 अगोदर होस्ट ब्रॉडकास्टरशी बोलताना राहुल द्रविड म्हणाले की, पहिल्यांदा कॅप दिली गेलेला प्रत्येक खेळाडू पूर्ण पात्र आहे याबद्दल खेद वाटण्याचे काही कारण नाही. केवळ पाच तज्ज्ञ फलंदाज उपलब्ध असताना द्रविडने कबूल केले की संघाचे संतुलन हलण्याची शक्यता आहे. ”दुर्दैवाने, क्रुणालचे जवळचे संपर्क या मालिकेत भाग घेणार नाहीत. आमच्याकडे 11 खेळाडू निवडायला आहेत आणि आम्हाला ते खेळावे लागतील. याबद्दल वाईट वाटण्यासारखे काही नाही. सर्व 11 जण प्लेइंग इलेव्हन बनवण्यात सक्षम आहेत आणि म्हणूनच त्यांना संघात निवडले गेले. मला त्यांची कामगिरी पाहून आनंद होत आहे. हो, संघाचे संतुलन थोडे नाजूक होईल कारण आम्ही उपलब्ध खेळाडूंकडूनच निवड करू शकतो,” राहुल द्रविड म्हणाले.

दरम्यान, श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकली असून पहिल्या सामन्याप्रमाणेच त्यानेही भारताला फलंदाजीला बोलावले. चेतन सकरिया, देवदत्त पाडीकल, रुतूराज गायकवाड आणि नितीश राणा यांना टी-20 पदार्पणाची संधी देण्यात आली असून कर्णधार शिखर धवन आणि संजू सॅमसन हे प्लेइंग इलेव्हन मधील दोन अनुभवी फलंदाज आहेत. बीसीसीआयने गुरुवारी ताज्या निवेदनात म्हटले आहे की गुरुवारी दुपारी सर्व कृणालच्या संपर्कांत आलेल्या सर्व खेळाडूंची कोविड-19 चाचणी नकारात्मक आली आहे. बोर्डाने पुढे म्हटले की सुरक्षा उपाय म्हणून सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत.