IND vs SL 2nd ODI: श्रीलंकेचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय; मालिका जिंकण्याची भारताला संधी, पाहा प्लेइंग XI
श्रीलंका विरुद्ध भारत वनडे (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SL 2nd ODI: श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) वनडे सामन्यांची मालिका खिशात घालण्याच्या निर्धारात शिखर धवनची (Shikhar Dhawan) टीम इंडिया (Team India) आज आर. प्रेमदासा स्टेडियमच्या मैदानावर उतरणार आहे. सध्या भारतीय संघ (Indian Team) मालिकेत 1-0 अशा आघाडीवर आहे, त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संघाला संधी आहे. आजच्या सामन्यात श्रीलंकन कर्णधार दसून शनकाने (Dasun Shanaka) टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी धवन ब्रिगेडच्या प्लेइंग इलेव्हन झालेला नाही आहे. दुसरीकडे, श्रीलंकन प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे. ईसूरु उदानाच्या जागी कसुन रजीता याचा समावेश करण्यात आला आहे. आगामी टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर धवन समवेत पृथ्वी शॉ, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव या त्रिकुटांनी भारतीय फलंदाजीची धुरा सांभाळली. पृथ्वी आणि ईशानने सुरुवातीपासून लंकन गोलंदाजांवर हल्ला चढवला तर सूर्यकुमारने मधल्या फळीत संघाचा विजय निश्चित केला. (IND vs SL 2nd ODI Live Streaming: भारत आणि श्रीलंका दुसरा वनडे सामना लाईव्ह कधी आणि कसा पाहणार?)

दरम्यान, आजचा सामना भारतीय संघासाठी खूप महत्वाचा असेल. श्रीलंकेविरुद्ध मंगळवारी कोलंबोच्या आर. प्रेमादासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडियाने दुसरा एकदिवसीय सामना जिंकला तर ते पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघाला मागे टाकून एका विशिष्ट संघाविरुद्ध सर्वाधिक विजयाची नोंद करतील. एकदिवसीय सामन्यात विशिष्ट विरोधकांविरुद्ध संघाने सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम संयुक्तपणे भारत, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्या नावावर आहे. अशास्थितीत धवनच्या नेतृत्वात टीम विश्वविक्रमी कामगिरी करण्याच्या निर्धारित असतील.

पाहा प्लेइंग इलेव्हन

भारत: शिखर धवन (कॅप्टन), पृथ्वी शॉ, ईशान किशन, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, आणि भुवनेश्वर कुमार.

श्रीलंका: अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका (विकेटकीपर), भानुका राजपक्षे, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, वाहिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, कसून रजिथा, दुशमंथा चमीरा, आणि लक्षण संदकन.