
IND vs SL Series 2022 Schedule: वेस्ट इंडिजविरुद्ध West Indies) नुकत्याच संपुष्टात आलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत टीम इंडियाने (Team India) पूर्ण वर्चस्व गाजवले आणि पाहुण्या संघाचा व्हाईटवॉश केला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ (Indian Team) टी-20 मालिकेत देखील अपराजित राहिला. या मालिकेत भारताच्या युवा स्टास खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत आपली छाप सोडली. त्यामुळे श्रीलंका खेळाडूंसमोर रोहित शर्माच्या भारतीय ब्रिगेडचा विजयी रथ रोखण्याचे कटू आव्हान असणार आहे. विंडीजविरुद्ध आव्हानात्मक मालिकेनंतर आता टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) तीन सामन्यांची टी-20 आणि त्यानंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहेत. (IND vs SL Series: आगामी श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माची कसोटी कर्णधारपदी नियुक्ती)
यावर्षी ऑस्ट्रेलिया येथे टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. आणि गेल्या वर्षी निराशाजनक कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड त्यासाठी तयारी करत आहेत. श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेमुळे भारताला त्यांच्या खेळाडूंची आणि संयोजनाची चाचणी करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. याशिवाय भारतीय संघाची नजर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेवर देखील असेल. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या गेल्या हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने फायनल सामान्यांपर्यंत प्रवास केलं, पण पण त्यांना पराभवाचे तोंड पाहण्यास भाग पडले. अंतिम फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. तसेच सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या क्रमवारीत टीम इंडियाची स्थिती खराब दिसत आहे. अशा परिस्थितीत श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारत चॅम्पियनशिप टेबलमध्ये आघाडीवर आपले स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्नशील असेल. या दौऱ्याचे संपूर्ण शेड्युल आणि भारतीय संघ खालीलप्रमाणे आहेत.
T20 मालिका
पहिला सामना- 24 फेब्रुवारी, एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ
दुसरा सामना- 26 फेब्रुवारी, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला
तिसरा सामना- 27 फेब्रुवारी, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला
कसोटी मालिका
पहिली कसोटी - 4 ते 8 मार्च, IS बिंद्रा स्टेडियम, मोहाली
दुसरी कसोटी - 12 ते 16 मार्च, एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलोर
भारतीय संघ खालीलप्रमाणे आहे.
T20 संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), हर्षल पटेल, मोहम्मद सिराज. संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, रवी बिश्नोई, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव.
कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, शुभमन गिल, केएस भरत, आर अश्विन (फिटनेसच्या अधीन), रवींद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि सौरभ कुमार.