IND vs SL 1st Test: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, श्रीलंकेच्या 4 बाद 108 धावा; पाहा भारताने किती धावांची आघाडी मिळवली
भारत विरुद्ध श्रीलंका (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st Test Day 2 Highlights: भारत (India) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील मोहाली कसोटीच्या (Mohali Test) दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून पाहुणा लंकन संघ सध्या फलंदाजी करत आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने भारताने आपला डाव 574/8 धाव धावांत घोषित केल्यावर फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकाने 4 विकेट गमावून 108 धावा केल्या होत्या. दिवसाच्या सुरुवातीला फलंदाजांच्या आक्रमक खेळीनंतर गोलंदाजांनी लंकन फलंदाजांवर हल्ला चढवला. अशाप्रकारे दुसऱ्या दिवसाखेरीस भारताने 466 धावांची विशाल आघाडी मिळवली आहे. पथुम निसंका धावा आणि धनंजय डी सिल्वा धावा करून खेळत होते. दुसरीकडे, भारताकडून आतापर्यंत रविचंद्रन अश्विनने दोन गडी बाद केले तर रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे. (IND vs SL 1st Test 2022: रवींद्र जडेजाने केला कहर, नाबाद दीडशतकी खेळीसह दिग्गजांना मागे टाकून बनला 1 नंबरी; पहा मोहालीत दुसऱ्या दिवशी पडला विक्रमांचा पाऊस)

दरम्यान भारताने 8 विकेट गमावून 574 धावांत पहिला डाव घोषित केला. टीम इंडियाला या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात रवींद्र जडेजाच्या नाबाद 175 धावांचा मोठा वाटा उचलला. तर ऋषभ पंतने 96, आर अश्विनने 61 आणि हनुमा विहारीने 58 धावांचे योगदान दिले. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना भारतासाठी कोणत्याही खेळाडूने केलेली ही जडेजाची सर्वोच्च धावसंख्या आहे. दुसरीकडे, श्रीलंका गोलंदाजांना दुसऱ्या विकेटसाठी चांगला संघर्ष करावा लागला. जडेजाने पहिले पंत, अश्विन, आणि अखेरीस मोहम्मद शमीच्या साथीने शतकी भागीदारी करून संघाला विक्रमी धावसंख्येचा पल्ला गाठून दिला. प्रत्युत्तरात दिमुथ करुणारत्ने आणि लाहिरू थिरिमने यांनी संघाला संयमी सुरुवात करून दिली. पण 48 धावसंख्येवर अश्विनने थिरिमानेला पायचीत करून भारताला पहिले यश मिळवून दिले. अश्विन पाठोपाठ जडेजाने कर्णधार करुणारत्नेला फिरकीच्या जाळ्यात अडकवले. यानंतर संघाने अँजेलो मॅथ्यूज आणि धनंजय डी सिल्वा यांची विकेटही स्वस्तात गमावली.

यापूर्वी या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यादिवशी भारताने सहा विकेट गमावून 357 धावा केल्यावर दुसऱ्या दिवशी बॅटने भारतीय संघाने आपला शानदार शो सुरूच ठेवला आणि श्रीलंकाई गोलंदाजांची धुलाई करून 574 धावांचा विक्रमी पल्ला गाठला. अशा परिस्थितीत आता भारताविरुद्ध लज्जास्पद पराभव टाळण्यासाठी श्रीलंकन फलंदाजांना दमदार कामगिरी करणे आवश्यक आहे.