IND vs SL 1st ODI Likely Playing XI: श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) 18 जुलैपासून सुरु होणाऱ्या तीन वनडे सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. वनडे आणि टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी अनुभवी खेळाडूंशी तब्ब्ल सहा युवा-नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी श्रीलंकाविरुद्ध मर्यादित ओव्हरची मालिका टीम इंडियाची (Team India) एकमेव आंतरराष्ट्रीय कामगिरी असल्याने बहु-देशीय स्पर्धेसाठी काही उपयुक्त पर्याय मिळवण्याचे लक्ष्य प्रशिक्षक राहुल द्रविडचे असेल. तसेच युवा खेळाडूंना परदेशात त्यांची कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध मिळेल. (IND vs SL 2021: श्रीलंका दौऱ्यावर चमकू शकते ‘या’ 3 भारतीय खेळाडूंचे भाग्य, बनू शकतात टीम इंडियाचे पुढील सुपरस्टार्स)
पहिल्या वनडे सामन्यात शिखर धवन सलामीला उतरेल पण यंदा त्याला नवीन सलामी जोडीदार मिळणार आहे. यासाठी युवा पृथ्वी शॉ मुख्य दावेदार आहे. धवन आणि पृथ्वी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी देखील सलामीला उतरतात त्यामुळे दोघांचा तालमेल सर्वोत्तम असेल. त्यामुळे प्रशिक्षक राहुल द्रविड बहुधा धवन-शॉच्या सलामीच्या जोडीला पहिले मैदानात पाठवतील. तिसऱ्या स्थानावर सूर्यकुमार यादव आपले वनडे पदार्पण करेल. सूर्यकुमार हा भारतीय क्रिकेटचा भावी स्टार मानला जात आहे आणि वनडे फॉर्मेटमध्ये तो लंका देशात कशी कामगिरी करतो यावर सर्वांचे लक्ष आहे. संजू सॅमसन संघाचा विकेटकीपर असेल. सॅमसन हा एक उच्च दर्जाचा घरगुती खेळाडू आहे परंतु उजव्या हाताचा फलंदाज त्याला ज्या काही संधी मिळते त्याविषयी छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे यंदा धावा करण्यावर तो भर देऊ इच्छित असेल.
मनीष पांडे पाचव्या स्थानावर फलंदाजी करताना दिसेल. 2016 पासून पांडे मर्यादित षटकांच्या संघाशी निगडित आहेत पण सतत बदलामुळे त्याला संघात आपले स्थान निश्चित करता आले नाही. श्रीलंका दौऱ्यावर काही मोठ्या खेळी खेळत आपले स्थान पुन्हा मिळवण्याचा पांडेचा निर्धार असेल. हार्दिक पांड्या संघात अष्टपैलू म्हून संघात कमबॅक करेल. हार्दिकने बॅटिंगने प्रभावित केले आहे पण यंदाच्या हार्दिकच्या गोलंदाजीच्या कामगिरीकडे टीम मॅनेजमेंट उत्सुकतेने पाहत असेल. कृणाल पांड्या व युजवेंद्र चहल संघाचे फिरकी गोलंदाज असतील. याशिवाय भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर हे वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील.
भारताचा संभावित प्लेइंग XI: शिखर धवन (कॅप्टन), पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), मनीष पांडे, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि युजवेंद्र चहल.