IND vs SA: परदेशात पहिल्या परीक्षेत राहुल द्रविड फेल, शोएब अख्तर म्हणाला - ‘भारतीय प्रशिक्षकाला सिद्ध करावे लागेल की...’
राहुल द्रविड (Photo Credit: PTI)

पाकिस्तानचा (Pakistan) माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला (Shoaib Akhtar) वाटते की विराट कोहलीचा (Virat Kohli) काळ संपल्यानंतर भारत एका चौरस्त्यावर उभा आहे आणि राहुल द्रविडला (Rahul Dravid) प्रशिक्षक म्हणून ओव्हररेटेड नाही हे सिद्ध करण्याचे मोठे आव्हान आहे. लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये आशिया लायन्सकडून (Asia Lions) खेळणाऱ्या अख्तरने दुसऱ्या वनडेत भारताच्या पराभवानंतर स्पष्ट टिप्पणी केली. एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेतल्याच्या आठवड्यांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) कसोटी मालिकेत 1-2 अशा पराभवानंतर कोहलीने प्रदीर्घ फॉर्मेटच्या नेतृत्वात पदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. प्रभारी कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वात भारताने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही (South Africa Tour) मालिका गमावली, जी प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नवीन कोचिंग व्यवस्थापनातील परदेश दौऱ्यावरील पहिला पराभव ठरला. (IND vs SA 3rd ODI: दोन सामन्यांनंतर टीम इंडिया XI मधून ‘या’ खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता, आकाश चोप्रा म्हणाले- ‘तो अनफिट आहे हे पचत शकत नाही’)

अख्तरने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबद्दल एक स्पष्ट टिप्पणी केली आहे आणि असे मत व्यक्त केले आहे की भारताच्या दिग्गजाला सिद्ध करावे लागेल की तो ओव्हररेट प्रशिक्षक नाही. खेळाच्या दोन फॉरमॅटमध्ये 10,000 हून अधिक धावा करणाऱ्या दोन भारतीय फलंदाजांपैकी एक असलेल्या द्रविड नोव्हेंबर 2021 भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला. द्रविडच्या मार्गदर्शनात भारताने दमदार सुरुवात केली आणि घरच्या मैदानावर न्यूझीलंडचा पराभव केला. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय मालिका गमावली. “नाही, भारतीय क्रिकेट खाली जात नाही. तुम्हाला परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे लागेल. राहुल द्रविडच्या हातात एक मोठे काम आहे. मला आशा आहे की लोक असे म्हणणार नाहीत की तो ओव्हररेटेड प्रशिक्षक आहे. त्याला हे सिद्ध करावे लागेल, आणि स्पष्टपणे रवी शास्त्रीची जागी भरण्यासाठी त्याच्याकडे मोठे आव्हान आहेत. त्याच्यापुढे एक मोठे काम आहे, तो कसा कामगिरी करतो ते पाहूया,” अख्तरने पीटीआयला सांगितले.

वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध घरच्या मालिकेमध्ये टीम इंडियाने वर्चस्व गाजवण्याची अपेक्षा असली तरी वर्षाच्या शेवटी इंग्लंडविरुद्ध मालिकेत टीम इंडियासाठी अवघड काम असेल. द्रविडच्या मार्गदर्शनात भारत किमान तीन आयसीसी स्पर्धा खेळेल आणि भारताचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवणे हे आयसीसी हॉल ऑफ फेमरसाठी आणखी एक आव्हान आहे.