IND vs SA 3rd Test Day 4: भारताविरुद्ध (India) केपटाऊनच्या न्यूलँड्स येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने (South Africa) 7 विकेटने दणदणीत विजय मिळवला 2-1 अशी मालिका काबीज केली. टीम इंडियाला (Team India) Proteas दौऱ्यावर पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याची संधी होती मात्र युवा फलंदाज कीगन पीटरसनच्या (Keegan Pietersen) धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने 212 धावांचे माफक लक्ष्य सहजतेने गाठले आणि भारताचे विजयाच्या आशेवर पाणी फेरले. पीटरसनने 82 धावांची शानदार खेळी केली. तसेच रॅसी व्हॅन डर डुसेन 41 धावा आणि टेंबा बावुमा 32 धावा करून नाबाद परतले. टेंबा बावुमाने चौकार खेचून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. भारताकडून मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर आणि जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात प्रत्येकी एक विकेट घेतल्या. सेंच्युरियनमध्ये भारताने तर जोहान्सबर्गमध्ये यजमानांनी जोरदार विजय मिळवला होता, पण तिसऱ्या सामन्यात निराशाजनक फलंदाजीने त्यांचे मालिका विजयाचे स्वप्न भंगले. (IND vs SA 3rd Test Day 4: चुकीला माफी नाही! Cheteshwar Pujara ने कीगन पीटरसनचा झेल सोडणे भारताला नडालं, विराट कोहलीची धक्कादायक प्रतिक्रिया व्हायरल)
सामन्याबद्दल बोलायचे तर भारतीय कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला पण फलंदाजांच्या बॅटने अपयशाने तो अयोग्य ठरला. स्वतः कोहलीला वगळता अन्य फलंदाजी मोठी खेळी करू शकले नाही. विराटने 79 तर चेतेश्वर पुजाराने 43 धावांचे योगदान दिले. मात्र कगिसो रबाडाच्या नेतृत्वात वेगवान गोलंदाजांच्या आक्रमणासमोर भारतीय खेळाडू अधिक काळ टिकू शकले नाही. परिणामी संघ पहिल्या डावात 223 धावांत ढेर झाला. प्रत्युत्तरात यजमान संघ 210 धावाच करू शकला ज्यामुळे भारताला 13 धावांची माफक आघाडी मिळाली. पीटरसनने पहिल्या डावात संघासाठी आकर्षक भूमिका बजावली आणि 72 धावा ठोकल्या. तर टेंबा बावुमाने 28 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबुत धाडला. तथापि दुसऱ्या डावात देखील भारतीय संघाच्या खराब फलंदाजी सत्र सुरूच राहिले.
South Africa win! 🔥
Bavuma and van der Dussen take them over the line!
A terrific victory for a young team – what a performance! 🙌
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNxpgZ3 (in select regions)#WTC23 | https://t.co/Wbb1FE2mW1 pic.twitter.com/uirBesoYdp
— ICC (@ICC) January 14, 2022
भारतासाठी दुसऱ्या डावात रिषभ पंतने झुंजार नाबाद शतकी खेळी केली, पण दुसऱ्या टोकाने सतत विकेट पडत असल्याने टीम इंडिया तिसऱ्या दिवशी 198 धावांतच गारद झाली आणि यजमान संघाला 212 धावांचे टार्गेट मिळाले. यजमान आफ्रिकेसाठी मार्को जॅन्सनने (Marco Jansen) 4 तर कगिसो रबाडा-लुंगी एनगिडीने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. एडन मार्करम व डीन एल्गर दुसऱ्या डावात अनुक्रमे 16 व 30 धावांवर माघारी परतले. पण चौथ्या दिवशी पीटरसन आणि संयमी फलंदाजी करणारा व्हॅन डर डुसेनने अर्धशतकी भागीदारी करून संघाला सामन्यासह मालिकेत विजयीरेष ओलांडून दिली.