IND vs SA 2nd Test Day 1: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गच्या (Johannesburg) वांडरर्स स्टेडियमवर सुरु आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकली असून विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीत सलामीवीर केएल राहुलच्या हाती संघाची कमान सोपवण्यात आली आहे. नाणेफेकीचा कौल राहुलच्या बाजूने लागला ज्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात विराटच्या जागी हनुमा विहारीला (Hanuma Vihari) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. हनुमा यापूर्वी ‘भारत अ’ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होता आणि त्याने बॅटने प्रभावी खेळ केला ज्यामुळे कदाचित त्याची दुसऱ्या कसोटीसाठी निवड झाली आहे. तथापि भारताला श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याची संधी होती परंतु संघ व्यवस्थापनाने विहारीला संधी दिली. अय्यरने न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावले. बीसीसीआयने (BCCI) अय्यरचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश न करण्याबाबत निवेदन जारी केले आहे. (IND vs SA 2nd Test: KL Rahul बनला भारताचा 34वा कसोटी कर्णधार, टीम इंडियात एकावेळी कधीच निश्चित नव्हते स्थान; जाणून घ्या ‘कर्णधार’ बनण्याचा प्रवास)
बीसीसीआयने दिलेल्या निवेदनात म्हटले, “टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला आज सकाळी पाठीच्या वरच्या बाजूला दुखापत झाली आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द वांडरर्स येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दिसणार नाही.” बीसीसीआयने पुढे म्हटले, “या कसोटी सामन्यादरम्यान बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुल संघाचे नेतृत्व करेल. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने जसप्रीत बुमराहला दुसऱ्या कसोटीसाठी उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यरलाही पोट खराब असल्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी निवडीपासून वगळण्यात आले आहे.” विराट कोहलीच्या जागी विहारीला इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. सेंच्युरियनमधील पहिल्या कसोटीत सर्वसमावेशक विजयानंतर भारत सध्या तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.
🚨 Indian skipper Virat Kohli ruled out of the second #SAvIND Test in Johannesburg.
More details 👇 #WTC23 https://t.co/6eHvLmjJlS
— ICC (@ICC) January 3, 2022
दरम्यान विराट तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्यात असणार की नाही यावर संभ्रम असताना तो 19 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना दिसू शकतो. नवीन मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत राहुल एकदिवसीय मालिकेतही संघाचे नेतृत्व करेल. भारतीय संघाच्या वेळापत्रकानुसार, सर्व काही ठीक राहिल्यास कोहलीला आता फेब्रुवारीमध्ये बेंगलोरमध्ये श्रीलंकेविरुद्ध 100वी कसोटी खेळण्याची संधी मिळेल.